BGT मोहिमेवर टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना, ऑस्ट्रेलियाला कोण कोण गेलं व्हिडीओत पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BGT मोहिमेवर टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना, ऑस्ट्रेलियाला कोण कोण गेलं व्हिडीओत पाहा

BGT मोहिमेवर टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना, ऑस्ट्रेलियाला कोण कोण गेलं व्हिडीओत पाहा

Nov 11, 2024 11:38 AM IST

Indian Cricket Team : 'भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

BGT मोहिमेवर टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना, ऑस्ट्रेलियाला कोण कोण गेलं व्हिडीओत पाहा
BGT मोहिमेवर टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना, ऑस्ट्रेलियाला कोण कोण गेलं व्हिडीओत पाहा

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावरून बॉर्ड-गावस्कर ट्रॉफीसाठी रवाना झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघासह ऑस्ट्रेलियाला गेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाऊ शकणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा दुसऱ्यांदा पिता बनणार आहे. या कारणास्तव त्याने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. यानंतर ६ डिसेंबरपासून दोन्ही संघ आमनेसामने येतील.

तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी ३ जानेवारीपासून सिडनी येथे खेळवली जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा (नोव्हेंबर-जानेवारी २०२५)

२२-२६ नोव्हेंबर: पहिली कसोटी, पर्थ

६-१० डिसेंबर: दुसरी कसोटी, ॲडलेड

१४-१८ डिसेंबर: तिसरी कसोटी, ब्रिस्बेन

२६-३० डिसेंबर: चौथी कसोटी, मेलबर्न

०३-०७ जानेवारी: पाचवी कसोटी, सिडनी

 

Whats_app_banner