चेन्नई कसोटीपूर्वी रोहित शर्माची सिंहगर्जना, बुमराह-केएल राहुलबाबत स्पष्टच बोलला! पत्रकार परिषदेतील ५ मोठे मुद्दे? वाचा-indian cricket team captain rohit sharma press confrence before ind vs ban chennai test talk about bumrah siraj kl rahu ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  चेन्नई कसोटीपूर्वी रोहित शर्माची सिंहगर्जना, बुमराह-केएल राहुलबाबत स्पष्टच बोलला! पत्रकार परिषदेतील ५ मोठे मुद्दे? वाचा

चेन्नई कसोटीपूर्वी रोहित शर्माची सिंहगर्जना, बुमराह-केएल राहुलबाबत स्पष्टच बोलला! पत्रकार परिषदेतील ५ मोठे मुद्दे? वाचा

Sep 17, 2024 04:14 PM IST

rohit sharma press confrence : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत आपले मत मांडले. त्याने सांगितले बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची रणनीती काय असेल? यावर भाष्य केले.

rohit sharma press confrence : चेन्नई कसोटीपूर्वी रोहित शर्माची सिंहगर्जना, बुमराह-केएल राहुलबाबत स्पष्टच बोलला! पत्रकार परिषदेतील ५ मोठे मु्द्दे? वाचा
rohit sharma press confrence : चेन्नई कसोटीपूर्वी रोहित शर्माची सिंहगर्जना, बुमराह-केएल राहुलबाबत स्पष्टच बोलला! पत्रकार परिषदेतील ५ मोठे मु्द्दे? वाचा (AFP)

भारत आणि बांगलादेश यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघ आमनेसामने असतील.

याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज मंगळवारी (१७ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची रणनीती काय असेल? यासह विविध प्रश्नांवर त्याने सविस्तर उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेतील ५ मोठ्या मुद्यांवर आपण एक नजर टाकणार आहोत.

रोहित शर्माने सांगितले की, बांगलादेश मालिका हा ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आमच्यासाठी सराव नाही. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा बरेच काही पणाला लागते. वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा असतो.

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरबाबत रोहित काय म्हणाला?

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरबाबत रोहित शर्मा म्हणाला की काही गोष्टी सोप्या असतात. प्लेइंग इलेव्हनची निवड करताना आपण गेल्या काही वर्षांतील कामगिरी पाहतो, पाहतो की कोण जास्त योगदान देऊ शकेल? आम्ही सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा प्रयत्न करतो.

बुमराह आणि मोहम्मद सिराजबद्दल रोहित काय म्हणाला?

रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही गोलंदाजांना फिरवत राहू, हे आमच्या मनात आहे. तुमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असावा अशी तुमची इच्छा आहे, परंतु असे नेहमीच होत नसते.

याशिवाय रोहित शर्माने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आम्ही फिजिओशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की, दोघांनाही विश्रांती कधी द्यायची?

बुमराह आणि सिराज यांच्या वर्कलोड मॅनेजमेंट कसे होणार?

रोहित शर्मा म्हणाला की, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देऊन आम्ही त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करू. यासाठी आपण फिजिओशी बोलू. तसेच दुलीप ट्रॉफीमधून अनेक उत्कृष्ट खेळाडू येत आहेत.

केएल राहुलबद्दल कर्णधाराचे काय काय?

केएल राहुलच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला की, प्रत्येकाच्या करिअरमध्ये चढ-उतार येत असतात. जेव्हा मी कर्णधार झालो तेव्हा मला केएल राहुलला जास्तीत जास्त संधी द्यायची होती. आम्हाला त्याच्याकडून काय हवे आहे ते आम्ही स्पष्टपणे सूचित केले. यानंतर त्याने अनेक वेळा चांगली खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेत शतक ठोकले. तर इंग्लंडविरुद्ध जवळपास ८० धावांची इनिंग खेळली होती.

Whats_app_banner