Team India Schedule : प्रत्येक महिन्यात टीम इंडियाचा सामना, असं आहे २०२५ मधील क्रिकेटचं संपूर्ण वेळापत्रक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India Schedule : प्रत्येक महिन्यात टीम इंडियाचा सामना, असं आहे २०२५ मधील क्रिकेटचं संपूर्ण वेळापत्रक

Team India Schedule : प्रत्येक महिन्यात टीम इंडियाचा सामना, असं आहे २०२५ मधील क्रिकेटचं संपूर्ण वेळापत्रक

Dec 31, 2024 02:24 PM IST

Team India 2025 Schedule : टीम इंडिया २०२५ ची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीने करणार आहे. यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध ३ वनडे आणि ५ टी-20 सामने खेळायचे आहेत.

Team India Schedule : प्रत्येक महिन्यात टीम इंडियाचा सामना, असं आहे २०२५ मधील क्रिकेटचं संपूर्ण वेळापत्रक
Team India Schedule : प्रत्येक महिन्यात टीम इंडियाचा सामना, असं आहे २०२५ मधील क्रिकेटचं संपूर्ण वेळापत्रक (PTI)

Indian Cricket Team 2025 Full Schedule : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२४ हे वर्ष काही खास राहिलेले नाही. टीम इंडिया टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनली असली तरी टीमला अनेकदा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता पुढच्या वर्षी टीम इंडियाला जुन्या आठवणी विसरून नवा इतिहास लिहायला आवडेल. टीम इंडियाला २०२५ मध्ये दोन मोठ्या स्पर्धाही खेळायच्या आहेत.

जवळपास दर महिन्याला भारतीय संघ कुठे ना कुठे सामने खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया २०२५ ची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीने करणार आहे. यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध ३ वनडे आणि ५ टी-20 सामने खेळायचे आहेत. 

त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही खेळवली जाणार आहे. गेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. अशा परिस्थितीत यावेळी टीम इंडियाला ही स्पर्धा नक्कीच जिंकायची आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर खेळवला जाईल. आयपीएल २०२५ मार्चमध्ये सुरू होईल, तर त्याचा अंतिम सामना मे महिन्यात होईल.

आयपीएलनंतर टीम इंडिया लगेचच इंग्लंडला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा इंग्लंड दौरा जून ते ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

यानंतर सप्टेंबरमध्ये आशिया चषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२५ आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल, जो भारतात होणार आहे. 

त्यानंतर ऑक्टोबरमध्ये टीम इंडियाचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. यानंतर भारताला ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियासोबत ३ वनडे आणि ५ टी-20 सामने खेळायचे आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा संघ नोव्हेंबरमध्येच भारतात येणार आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-20 सामने खेळवले जातील. एकंदरीत २०२५ मध्ये टीम इंडिया खूप व्यस्त असणार आहे.

टीम इंडियाचे २०२५ चे वेळापत्रक

जानेवारी -  ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा कसोटी सामना (सिडनी)

जानेवारी-फेब्रुवारी - इंग्लंडविरुद्ध ३ वनडे आणि ५ टी-२०  (मायदेशात)

फेब्रुवारी-मार्च - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (पाकिस्तान आणि दुबई)

एप्रिल-मे - आयपीएल २०२५

जून - डब्ल्यूटीसी फायनल (पात्र ठरल्यास)

जून-जुलै-ऑगस्ट - इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी  (इंग्लंड दौरा)

ऑगस्ट - बांगलादेशविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी-२० सामने (बांगलादेश)

सप्टेंबर- ऑक्टोबर - आशिया चषक टी-२० (मायदेशात)

ऑक्टोबर - वेस्ट इंडिजविरुद्ध २ कसोटी सामने  (डब्ल्यूटीसी २०२५-२७) (मायदेशात

ऑक्टोबर-नोव्हेंबर - ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे आणि ५ टी-२० सामने (ऑस्ट्रेलिया)

नोव्हेंबर-डिसेंबर - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी (डब्ल्यूटीसी २०२५-२७), ३ वनडे आणि ५ टी-२० सामने  (मायदेशात)

Whats_app_banner

संबंधित बातम्या