Team India full Schedule 2025 : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. आता तिसरी कसोटी १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीलादेखील भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच राहणार आहे.
नवीन वर्षात टीम इंडिया पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळणार आहे. पण २०२५ चा पहिला एकदिवसीय आणि पहिला टी-20 इंग्लंड विरुद्ध होणार आहे. टीम इंडिया २०२४ चा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. यानंतर नवीन वर्ष सुरू होईल.
टीम इंडिया ३ जानेवारी २०२५ पासून सिडनीमध्ये मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी खेळणार आहे. २०२५ मधील टीम इंडियाचा हा पहिला सामना असेल. यानंतर टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
खरंतर, इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी २०२५ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारीला कोलकाता येथे होणार आहे. या मालिकेतील शेवटचा टी-२० सामना २ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे.
यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना नागपुरात ६ फेब्रुवारीला होणार आहे. तर शेवटचा वनडे १२ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - पाचवी कसोटी - सिडनी (३ जानेवारी)
(भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथा कसोटी सामना ३० डिसेंबर रोजी संपणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड - पहिला टी-20 - २२ जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड - दुसरा टी-20 - २५ जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड - तिसरा टी-20 - २८ जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड - चौथा टी-20 - ३१ जानेवारी
भारत विरुद्ध इंग्लंड - पाचवा टी-20 - २ फेब्रुवारी
भारत विरुद्ध इंग्लंड - पहिला वनडे - ६ फेब्रुवारी
भारत विरुद्ध इंग्लंड - दुसरा वनडे - ९ फेब्रुवारी
भारत विरुद्ध इंग्लंड - तिसरा वनडे - १२ फेब्रुवारी
संबंधित बातम्या