Indian Cricket Team 2024 Schedule : टीम इंडियासाठी २०२३ हे वर्ष चांगले राहिले आहे. यावर्षी टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वनवर राहिली. पण पण सोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने यावर्षी दोन आयसीसी ट्रॉफीच्या फायनल गमावल्या आहेत. भारताने WTC फायनल आणि वनडे वर्ल्डकपची फायनल गमावली आहे. या दोन्ही फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धुव्वा उडवला.
सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. केपटाऊनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
विशेष म्हणजे, या केपटाउन कसोटी सामन्याद्वारे टीम इंडिया नवीन वर्षाची सुरुवात करेल. यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 (ind vs afg t20 series) मालिका खेळणार आहे.
टीम इंडियाला ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या वर्षातही टीम इंडियाचे वेळापत्रक व्यस्त राहणार आहे. या वर्षात टी-20 वर्ल्डकप होणार आहे.
T20 विश्वचषकाव्यतिरिक्त २०२४ मध्ये टीम इंडिया अफगाणिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये मालिका खेळणार आहे. याशिवाय आयपीएल २०२४ मुळेही टीम इंडियाचे खेळाडू व्यस्त असतील.
२०२४ चा टी-20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. यानंतर भारत तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेला जाईल. त्यानंतर २०२४ या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ भारत दौऱ्यावर येतील.
जानेवारी २०२४- भारत आफ्रिका दुसरी कसोटी
११ जानेवारी ते ११ जानेवारी – भारत -आफ्रिका टी-20 मालिका
२५ जानेवारी ते ११ मार्च – इंग्लंडचा भारत दौरा
भारत आणि इंग्लंड ५ कसोटी आणि ५ टी-20 सामन्यांची मालिका
मार्च अखेरपासून ते मे अखेरपर्यंत - आयपीएल २०२४
४ जून ते ३० जून - टी-20 वर्ल्डकप २०२४
जुलै २०२४ - भारताचा श्रीलंका दौरा
तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका (तारीख जाहीर नाही)
सप्टेंबर २०२४- बांगलादेशचा भारत दौरा
तीन टी-20 आणि २ कसोटी सामन्यांची मालिका (तारीख जाहीर नाही)
ऑक्टोबर २०२४ - न्यूझीलंडचा भारत दौरा
भारत-न्यूझीलंड ३ कसोटी सामन्यांची मालिका
नोव्हेंबर-डिसेंबर २०२४ - भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी
संबंधित बातम्या