Rohit Sharma : रोहित शर्मा चक्क टॉस कॉइन विसरला! लाइव्ह नाणेफेकीदरम्यान घडला मजेशीर प्रसंग, एकदा पाहाच!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : रोहित शर्मा चक्क टॉस कॉइन विसरला! लाइव्ह नाणेफेकीदरम्यान घडला मजेशीर प्रसंग, एकदा पाहाच!

Rohit Sharma : रोहित शर्मा चक्क टॉस कॉइन विसरला! लाइव्ह नाणेफेकीदरम्यान घडला मजेशीर प्रसंग, एकदा पाहाच!

Jun 09, 2024 09:53 PM IST

Rohit Sharma Forgot Toss Coin : याआधी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले तेव्हा एक मजेशीर घटना घडली. रोहित शर्माच्या विसरळभोळेपणाचा आणखी एक किस्सा आज मैदानावर पाहायला मिळाला.

Rohit Sharma : रोहित पुन्हा विसरला… टॉसदरम्यान घडला मजेशीर प्रसंग, एकदा पाहाच!
Rohit Sharma : रोहित पुन्हा विसरला… टॉसदरम्यान घडला मजेशीर प्रसंग, एकदा पाहाच!

टी-20 वर्ल्डकप २०२४ चा सर्वात मोठा सामना आज (९ जून) भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर आमनेसामने आहेत.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हलक्या पावसामुळे टॉसला उशीर झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबर म्हणाला की ढगाळ स्थिती आहे आणि त्यांचे ४ वेगवान गोलंदाज त्याचा फायदा घेऊ इच्छितात. कर्णधार बाबरने प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. इमाद वसीम परतला आहे. आझम खान याला वगळण्यात आले आहे.

नाणे कुठं ठेवलंय हेच रोहित शर्मा विसरला

दरम्यान, याआधी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले तेव्हा एक मजेशीर घटना घडली. रोहित शर्माच्या विसरळभोळेपणाचा आणखी एक किस्सा आज मैदानावर पाहायला मिळाला.

वास्तविक, कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांची त्यांच्या खास शैलीत ओळख करून दिली. यानंतर नाणेफेकीची पाळी आली. पण यादरम्यान रोहित शर्माने त्याचा खिसा तपासण्यास सुरुवात केली. यावर बाबरने नाणे तुमच्याकडे असल्याचे सांगितले. यावर रोहितने खिशात हात घालून नाणे काढले. अशा प्रकारे रोहितची विसरण्याची सवय कायम असल्याचे सिद्ध झाले.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, हरिस रौफ.

Whats_app_banner