IND vs BAN : ड्रॉ होणाऱ्या सामन्यात टीम इंडियानं जीव आणला, रोहितसेनेनं दोन दिवसांत बांगलादेशला चिरडलं-india won kanpur test by 7 wickets against bangladesh rohit jaiswal ind vs ban 2nd kanpur test highlights ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : ड्रॉ होणाऱ्या सामन्यात टीम इंडियानं जीव आणला, रोहितसेनेनं दोन दिवसांत बांगलादेशला चिरडलं

IND vs BAN : ड्रॉ होणाऱ्या सामन्यात टीम इंडियानं जीव आणला, रोहितसेनेनं दोन दिवसांत बांगलादेशला चिरडलं

Oct 01, 2024 02:16 PM IST

IND vs BAN 2nd Kanpur Test : टीम इंडियाने कानपूर कसोटी ७ विकेट्सनी जिंकली आहे. ड्रॉकडे जाणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने आधी जीव आणला आणि नंतर ती धमाकेदार अंदाजात जिंकली. दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-० अशी खिशात घातली.

IND vs BAN : ड्रॉ होणाऱ्या सामन्यात टीम इंडियानं जीव आणला, रोहितसेनेनं दोन दिवसांत बांगलादेशला चिरडलं
IND vs BAN : ड्रॉ होणाऱ्या सामन्यात टीम इंडियानं जीव आणला, रोहितसेनेनं दोन दिवसांत बांगलादेशला चिरडलं (PTI)

टीम इंडियाने कानपूर कसोटी सामना ७ गडी राखून जिंकला आहे. अखेरच्या दिवशी (१ ऑक्टोबर) बांगलादेशने भारतीय संघाला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताने अवघ्या ३ गडी गमावून १७.३ षटकारत पूर्ण केले. अशा प्रकारे भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने धुव्वा उडवला.

बांगलादेश पहिला डाव- सर्वबाद २३३ धावा

भारत पहिल डाव- ९ बाद २८५ धावांवर घोषित

बांगलादेश दुसरा डाव- १४६ धावांवर सर्वबाद

भारत दुसरा डाव- ३ बाद ९८ धावा करत सामना जिंकला.

९५ धावांचा पाठलाग करताना भारताकडून यशस्वी जैस्वालने अर्धशतक केले. तो अर्धशतकानंतर ५१ धावा करून बाद झाला. विराट कोहली नाबाद परतला.

पाचव्या दिवशी बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १४६ धावांवर गारद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारताकडून बुमराह, अश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना २८० धावांनी जिंकला होता. रविचंद्रन अश्विनने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती.

तत्पूर्वी,  कानपूर कसोटीत भारताला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य होते. मात्र रोहित शर्माच्या (८) धावांच्या रूपाने भारतीय संघाला पहिला धक्का मेहदी हसन मिराजने दिला. यानंतर आलेल्या शुभमन गिलने (६) येताच चौकार ठोकला, पण तो पुन्हा मेहदीच्या फिरकीत अडकला आणि एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर यशस्वी जयस्वालने बाद होण्यापूर्वी ५१ धावा केल्या.

बांगलादेशचा दुसरा डाव

बांगलादेशने पाचव्या दिवसाची सुरुवात २६/२ धावांवरून केली. संघाने तिसरी विकेट लवकर गमावली. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी शादमान इस्लाम आणि नजमुल हुसेन शांतो यांनी ५५ (८४) धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. पण शादमान आणि शांतो यांच्यातील भागीदारी मोडताच बांगलादेशचा संघ गडगडला.

मात्र, शेवटी मुशफिकुर रहीम आणि खालिद अहम काही वेळ क्रीजवर उभे राहिले. या दोघांनी १०व्या विकेटसाठी १६ (३८) धावांची भागीदारी केली. 

बांगलादेशसाठी दुसऱ्या डावात शादमान इस्लामने १० चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ५० धावा केल्या. यादरम्यान भारताकडून जडेजा, अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर आकाश दीप याला १ विकेट मिळाली.

भारतानं सामन्यात जीव आणला

दरम्यान, या कसोटीचे दोन संपूर्ण दिवस पावसामुळे वाहून गेले होते, अशा स्थितीत हा सामना ड्रॉ होईल असे वाटत होते, पण टीम इंडियाने चौथ्या दिवशी आपल्या आक्रमक खेळाने हा सामना खूपच रोमांचक बनवला.

टीम इंडियाने पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी करत ३४.४ षटकात ९ बाद २८५ धावा करून डाव घोषित केला. यशस्वी जैस्वालने ५१ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने संघासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली. याशिवाय केएल राहुलने ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने स्फोटक फलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी मिळवली होती.

Whats_app_banner