मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs ENG 2nd Test : दोन सत्रातच इंग्लंडचा खेळ खल्लास, दुसरी कसोटी भारताने जिंकली, बुमराहचे ९ विकेट

IND Vs ENG 2nd Test : दोन सत्रातच इंग्लंडचा खेळ खल्लास, दुसरी कसोटी भारताने जिंकली, बुमराहचे ९ विकेट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 05, 2024 02:26 PM IST

India vs England Test Highlights : भारताने विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य दिले होते, या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २े९२ धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

India vs England 2nd Test Highlights
India vs England 2nd Test Highlights (PTI)

India vs England 2nd Test Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य दिले होते, यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २९२ धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना आता राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.

भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विनने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. बुमराहने या सामन्यात एकूण ९ विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदजी केली आणि सर्वबाद ३९६ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावात गारद झाला आणि भारताला १५३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला आणि पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. 

इंग्लंडला ३०० धावाही करता आल्या नाहीत

या विजयासह भारताने बॅझबॉल शैलीलाही दणका दिला आहे. दरम्यान, कालचा म्हणजेच, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला होता, की त्यांचा संघ ६०-७० षटकात ३९९ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, पण प्रत्यक्षात ते ३०० धावा देखील करू शकले नाहीत. इंग्लंडकडून फक्त जॅक क्रॉलीला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला.

 तत्पूर्वी, या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची पहिली विकेट खेळाच्या तिसऱ्या दिवशी पडली होती, बेन डकेटने फिरकी गोलंदाज आर. अश्विनच्या फिरकीवर झेलबाद झाला. त्यानंतर चौथ्या दिवशी नाईटवॉचमन रेहान अहमदच्या रुपाने पहिला विकेट पडला. अक्षर पटेलने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले यानंतर अश्विनने ऑली पोप आणि जो रूटला बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर आणले.

जो रूट अतिशय आक्रमक फटके खेळताना बाद झाला. अश्विनने ऑली पोपला बाद करून मोठा विक्रम केला. अश्विन हा इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने ९५ बळी घेणाऱ्या भागवत चंद्रशेखरला मागे टाकले.

यानंतर कुलदीप यादवने इंग्लंडला सर्वात मोठा धक्का दिला. कुलदीपने झॅक क्रॉलीला पायचीत केले. क्रॉली आक्रमक फलंदाजी करताना ७३ धावा करून बाद झाला.

तर यानंतर लगेच बुमराहने जॉन बेअरस्टोला आपला शिकार बनवले. तोही पायचीत झाला. तर लंचनंतर बेन स्टोक्सने श्रेयसच्या थ्रोवर धावबाद झाला. अवघ्या २२० धावांवर ७ विकेट पडल्यानंतर बेन फॉक्स आणि टॉम हार्टले यांनी ५५ धावांची भागीदारी करून इंग्लंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. पण जसप्रीत बुमराहने फॉक्सला बाद करून ही भागीदारी तोडली. फॉक्स बाद झाल्यानंतर भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता.

 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi