ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या महिला निवड समितीने मंगळवारी १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला. हरमनप्रीत कौरकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधार आहे.
यास्तिका भाटिया आणि श्रेयंका पाटील यांची संघात निवड करण्यात आली आहे, मात्र बीसीसीआयने या दोघींबद्दल म्हटले आहे की, त्यांची निवड फिटनेसवर अवलंबून असेल.
ट्रॅव्हल्स रिझर्व्ह गटात ३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे तर राखीव खेळाडूंमध्ये दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
टी-20 वर्ल्डकपच्या संघात भारताची फलंदाजी खूपच मजबूत दिसते. भारताकडे स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा हे दोन उत्कृष्ट ओपनर आहेत. भारताकडे बॅकअप ओपनर म्हणून डायलन हेमलता आहे. जेमिमाह रॉड्रिग्स, कर्णधार हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा मधल्या फळी सांभाळण्यासाठी आहेत. भारताकडे फिनिशर म्हणून यष्टिरक्षक रिचा घोष आहे.
भारताने यास्तिक भाटिया हिची बॅकअप विकेट कीपर म्हणन निवड केली आहे पण तिची निवड फिटनेसवर अवलंबून आहे. त्यामुळे यष्टीरक्षक उमा छेत्रीलाही ट्रॅव्हल रिझर्व्ह गटात स्थान मिळाले आहे.
भारताचे वेगवान गोलंदाजी आक्रमण पूजा वस्त्राकर आणि रेणुका सिंग यांच्यावर अवलंबून आहे. या दोघींशिवाय अरुंधती रेड्डी हिच्यावरही सर्वांच्या नजरा असतील. फिरकी आक्रमणाची जबाबदारी दीप्ती शर्मावर असेल. राधा यादव, आशा शोभना तिला साथ देतील.
अ गट: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका
ब गट: दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, स्कॉटलंड
४ ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
६ ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
९ ऑक्टोबर- भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
१३ ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, डायलन हेमलता, आशा शोभना. , राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना सजीवन
ट्रॅव्हल रिझर्व्ह : उमा छेत्री (विकेटकीपर), तनुजा कंवर, सायमा ठाकूर
राखीव खेळाडू : राघवी बिश्त, प्रिया मिश्रा