महिला टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आज (४ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड भिडणार आहेत. टीम इंडियाचा हा स्पर्धेतील पहिला सामना असेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना असेल. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही या स्पर्धेतील पहिला सामना आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सामना सुरू होईल.
महिला T20 विश्वचषक २०२४ मधील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना शुक्रवारी (४ ऑक्टोबर) होणार आहे. या दोघांमधील हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय चाहत्यांना संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून सामना लाईव्ह पाहता येणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमधील सामना स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. हॉटस्टारवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
महिला T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया- शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, दयालन हेमलता, एस सज्जना, एस. शोभना.
महिला T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ- सुझी बेट्स, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), हन्ना रो, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, लेह कॅस्परेक, जेस केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर .
संबंधित बातम्या