IND W vs IRE W : स्मृती मानधनाने इतिहास रचला, राजकोट वनडेत मोठा विक्रम नावावर झाला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND W vs IRE W : स्मृती मानधनाने इतिहास रचला, राजकोट वनडेत मोठा विक्रम नावावर झाला

IND W vs IRE W : स्मृती मानधनाने इतिहास रचला, राजकोट वनडेत मोठा विक्रम नावावर झाला

Jan 10, 2025 05:12 PM IST

Smriti Mandhana Record : स्मृती मंधानाने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत ४ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून स्मृती मंधानासाठी पोस्ट केली आहे.

IND W vs IRE W : स्मृती मानधनाने इतिहास रचला, राजकोट वनडेत मोठा विक्रम नावावर झाला
IND W vs IRE W : स्मृती मानधनाने इतिहास रचला, राजकोट वनडेत मोठा विक्रम नावावर झाला (PTI)

Smriti Mandhana In INDW vs IREW : भारतीय महिला संघ आणि आयर्लंड महिला संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज राजकोट येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आयर्लंडने ५० षटकांत ७ विकेट गमावून २३८ धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघाला विजयासाठी २३९ धावांचे लक्ष्य आहे.

आयर्लंडच्या २३८ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेल्या स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना २९ चेंडूत ४१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याचबरोबर तिने एक मोठा टप्पा गाठला आहे.

स्मृती मानधनाच्या वनडेत ४ हजार धावा पूर्ण

स्मृती मंधानाने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत ४ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. यानंतर बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून स्मृती मंधानासाठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये स्मृती मंधानाचे वनडे फॉरमॅटमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मानधनाने २९ चेंडूत ४१ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच वनडे फॉरमॅटमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या.

भारत-आयर्लंड सामन्यात काय घडलं?

या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्यानंतर आयर्लंडने ५० षटकात ७ बाद २३८ धावा केल्या. आयर्लंडसाठी कर्णधार गॅबी लुईस हिने १२९ चेंडूत सर्वाधिक ९१ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत १५ चौकार मारले.

याशिवाय लीह पॉल हिने ७३ चेंडूत ५९ धावांचे योगदान दिले. भारताकडून प्रिया मिश्राने सर्वाधिक २ बळी घेतले. तीत साधू, सायली सातघरे व दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात प्रतिका रावल हिने अर्धशतक केले असून हे वृत्त लिहिपर्यंत भारताने ३ बाद १९८ धावा केल्या होत्या. प्रतिका रावल ६८ तर तेजल हसबनीस ४० धावांवर खेळत होते. भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या