IND vs ENG : पुणे टी-20 सामना भारताने शेवटच्या षटकात जिंकला, हार्दिक-दुबेनंतर हर्षित राणाचा जलवा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : पुणे टी-20 सामना भारताने शेवटच्या षटकात जिंकला, हार्दिक-दुबेनंतर हर्षित राणाचा जलवा

IND vs ENG : पुणे टी-20 सामना भारताने शेवटच्या षटकात जिंकला, हार्दिक-दुबेनंतर हर्षित राणाचा जलवा

Jan 31, 2025 10:44 PM IST

India vs England 4th T20 Highlights : भारताने टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला आहे. या विजयासाह भारताने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

पुणे टी-20 सामना भारताने शेवटच्या षटकात जिंकला, हार्दिक-दुबेनंतर हर्षित राणाचा जलवा
पुणे टी-20 सामना भारताने शेवटच्या षटकात जिंकला, हार्दिक-दुबेनंतर हर्षित राणाचा जलवा (AP)

India vs England, 4th T20I Pune : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज (३१जानेवारी) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने १५ धावांनी विजय मिळवत मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली. 

भारतीय संघाच्या विजयात हर्षित राणा आणि रवी बिश्नोई या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी प्रत्येकी ३  विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजी करताना भारताने १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १६६ धावा करू शकला. गोलंदाजांच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. पुण्यातील विजयासह टीम इंडियाने मालिकेत अजेय आघाडी घेतली आहे.

पुण्यात झालेल्या या सामन्यात हर्षित राणाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ३ बळी घेतले. रवी बिश्नोईनेही ३ बळी घेतले. त्याने ४ षटकात २८ धावा दिल्या. वरुण चक्रवर्तीने ४ षटकात ८ धावा देत २ बळी घेतले. अर्शदीप सिंगला १ बळी मिळाला. अक्षर पटेललाही एक विकेट मिळाली.

सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला 

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १९.४ षटकांत १६६ धावा करून सर्वबाद झाला. अखेरच्या षटकात साकिब महमूदची विकेट पडली. तत्पूर्वी, जेमी ओव्हरटन १९व्या षटकात बाद झाला. तो १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जोफ्रा आर्चरला खातेही उघडता आले नाही. तो शून्यावर बाद झाला.

इंग्लंडसाठी ब्रूकचे अर्धशतक 

इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर फिलिप सॉल्ट आणि बेन डकेट यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. सॉल्ट २३ धावा करून बाद झाला. तर डकेटने ३९ धावांचे योगदान दिले. यानंतर कर्णधार जोस बटलर २ धावा करून बाद झाला. हॅरी ब्रूकने अर्धशतक झळकावले. त्याने २६ चेंडूत ५१ धावांची खेळी खेळली. लिव्हिंग्स्टन आणि बेथेल यांना काही विशेष करता आले नाही. कार्सही शुन्यावर बाद झाला.

टीम इंडियासाठी दुबे-पांड्याची दमदार कामगिरी 

भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या १ धावा करून बाद झाला. मात्र यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. या दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. पंड्याने ३० चेंडूत ५३ धावांची खेळी खेळली.

दुबेने ३४ चेंडूत ५३ धावा केल्या. अभिषेक शर्माने २९ धावांची खेळी केली. रिंकू सिंगने ३० धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा शून्यावर बाद झाले.

महमदूने ३ विकेट घेतले

इंग्लंडकडून गोलंदाजी करताना साकिब महमूदने ४  षटकात ३५ धावा दिल्या. त्याने ३ बळी घेतले. जेमी ओव्हरटनने २ बळी घेतले. तर कार्स आणि आदिल रशीद यांना १-१ विकेट मिळाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या