Dhruv Jurel vs Jitesh Sharma : भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारताच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. वास्तविक, या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे उपलब्ध असणार नाहीत.
शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन या तीन खेळाडूंना झिम्बाब्वेविरुद्धच्या पूर्ण मालिकेसाठी स्थान मिळाले होते. हे तिन्ही खेळाडू २०२४ च्या T20 विश्वचषकाचा भाग होते. पण सध्या विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला बार्बाडोसहून परतता आलेले नाही, त्यामुळे तिन्ही खेळाडू टीम इंडियासोबत झिम्बाब्वेला रवाना होऊ शकले नाहीत. अशा स्थितीत तिन्ही खेळाडूंऐवजी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांनी संघात स्थान देण्यात आले आहे.
पण यामुळे आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की भारतीय संघाचा यष्टिरक्षक कोण असेल? ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांच्यापैकी कोणाला भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल?
वास्तविक, टीम मॅनेजमेंटसाठी ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांच्यापैकी एकाची निवड करणे सोपे जाणार नाही. पण जितेश शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. जितेश शर्माचा टी-२० फॉरमॅटमधील रेकॉर्ड चांगला आहे. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापन कोणत्या यष्टीरक्षकाची निवड करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ध्रुव जुरेल भारताकडून कसोटी खेळला आहे. पण टी-२० फॉरमॅटमध्ये फारसा अनुभव नाही. आयपीएल २०२४ मध्ये, ध्रुव जुरेलने १४ सामने खेळले, ज्यामध्ये तो फक्त १९५ धावा जोडू शकला. मात्र, या मोसमात ध्रुव जुरेल खूपच कमी फलंदाजी करत होता. वास्तविक, ध्रुव जुरेल हा भविष्यातील स्टार मानला जात आहे, परंतु आजपर्यंत त्याला फारशा संधी मिळालेल्या नाहीत. विशेषत: आयपीएल सामन्यांचाही फारसा अनुभव नाही.
त्याचबरोबर जितेश शर्मा हा ध्रुव जुरेलपेक्षा जास्त अनुभवी आहे. आकडेवारी दर्शवते की ध्रुव जुरेलने ३८ टी20 सामन्यांमध्ये १३७.६१ च्या स्ट्राइक रेटने ४३९ धावा केल्या आहेत. तसेच दोनदा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर जितेश शर्माच्या आकडेवारीनुसार त्याने आतापर्यंत १२० टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १४७.९० च्या स्ट्राइक रेटने २४९० धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या