india vs sri lanka asia cup final highlights : भारताने चमकदार कामगिरी करत आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. भारत आठव्यांदा आशिया कपचा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी ५१ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी अवघ्या ६.१ षटकात पूर्ण केले.
टीम इंडियाने आठव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ मध्ये विजेतेपद पटकावले होते. भारताने ही स्पर्धा वनडेमध्ये ७ वेळा आणि टी-20 मध्ये एकदा जिंकली आहे, तर श्रीलंकेच्या संघाने ६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंकेने वनडेमध्ये ५ वेळा आणि टी-20 मध्ये एकदा विजेतेपद पटकावले आहे. तर पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे.
५१ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इशान किशन आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाकडून सलामीला आले. यावेळी कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीला आला नाही. इशान आणि गिल यांनी नाबाद राहिले आणि संघाचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यात गिल २७ धावा करून नाबाद राहिला तर ईशान २३ धावा करून नाबाद राहिला. भारतीय संघाने अवघ्या ६.१ षटकांत सामना जिंकला.
तत्पूर्वी, श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी श्रीलंकेच्या संघाकडून सलामीला आले. तर पहिले षटक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टाकले. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर बुमराहने कुसल परेराला आपला बळी बनवले.
यानंतर श्रीलंकेने सामन्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ३ षटकांत १ गडी बाद ८ धावा केल्या. पण इथून पुढच्या म्हणजेच डावाच्या चौथ्या षटकात आलेल्या सिराजने सगळी कथाच बदलून टाकली. त्याने या षटकातील ६ चेंडूत ४ धावा देत ४ मोठे बळी घेतले आणि श्रीलंकेच्या संघाचा फडशा पाडला.
श्रीलंका संघासाठी यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. तर दुशान हेमंताने १३ धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर ५ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ७ षटकात २१ धावा देत ६ बळी घेतले. तर हार्दिक पांड्याने २.२ षटकात ३ धावा देत ३ बळी घेतले. तर जसप्रीत बुमराहला १ विकेट मिळाला.