India Vs South Africa 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
करिअरची शेवटची कसोटी खेळणारा डीन एल्गर आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्माने भारतीय संघात दोन बदल केले आहेत. अश्विनच्या जागी रवींद्र जडेजा खेळत आहे. याशिवाय शार्दुल ठाकूरच्या जागी मुकेश कुमारचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
तर आफ्रिकेच्या संघात टेम्बा बवुमाच्या जागी ट्रिस्टन स्टब्सचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जेराल्ड कोएत्झीच्या जागी लुंगी एनगीडीला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले आहे.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका- डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जोर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरे (यष्टीरक्षक), मार्को यान्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.
न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर गवत आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळण्याची अपेक्षा आहे. येथील हवामानही वेगवान गोलंदाजांना मदत करते. सामन्यादरम्यान हलक्या स्वरुपाचे वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे चेंडूला अधिक मुव्हमेंट मिळेल. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना खेळणे कठीण जाईल, नंतर फिरकी गोलंदाजांनाही येथे मदत मिळेल.
चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे. कारण केपटाऊनचे हवामान पाच दिवस स्वच्छ राहणार आहे. त्यामुळे सामन्यात कोणताही अडथळा येणार नाही.