टी-20 विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना (२९ जून) बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ही विजेतेपदाची लढत शनिवारी होणार आहे. मात्र आतापर्यंत विश्वचषकातील अनेक सामने पावसामुळे वाहून गेले आहेत.
अशा स्थितीत २९ जून रोजीदेखील बार्बाडोसमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्याच्या दिवशी बार्बाडोसमध्ये पावसाची शक्यता ७५% आहे. पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे अंतिम सामन्याला उशीर झाल्यास, त्याच दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी १९० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागू केला जाईल.
दोन्ही संघ प्रत्येकी किमान १० षटके खेळतील तेव्हाच सामन्याचा निकाल लावला जाणार आहे. जर दोन्ही संघ किमान १०-१० षटके खेळू शकले नाहीत तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.
आयसीसीच्या नियमानुसार अंतिम सामना न झाल्यास किंवा टाय झाल्यास सुपर ओव्हर घेण्यात येते. राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही. तसेच, सुपर ओव्हरदेखील शक्य नसेल तर तर अंतिम सामन्याचा निकाल 'नो रिझल्ट' म्हणून घोषित केला जाईल.
सुपर ओव्हर न झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. T20 वर्ल्ड कपच्या १७ वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही संयुक्त विजेता झालेला नाही.
संबंधित बातम्या