भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच रविवारी (१० नोव्हेंबर) गेक्वेराहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू झाला, पण दुसऱ्या टी-२० च्या वेळेत थोडा बदल करण्यात आला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार एक तास आधी म्हणजेच संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार नाणेफेकसाठी अर्धा तास आधी मैदानात उतरतील.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिला सामना ६१ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अशा तऱ्हेने आज भारताच्या नजरा गक्वेब्राहामध्ये यजमानांना धूळ चारत आपली आघाडी दुप्पट करण्याकडे असतील.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज (१० नोव्हेंबर) रंगणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना गेक्वेराहा येथील सेंट जॉर्ज पार्क मैदानावर खेळला जात आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार नाणेफेकसाठी अर्धा तास आधी मैदानात उतरतील.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारतीय चाहत्यांना स्पोर्ट्स १८ च्या विविध चॅनल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई/यश दयाल, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, नाकाबा पीटर आणि ओटनीएल बार्टमन.