टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. आज म्हणजेच बुधवारी (१३ नोव्हेंबर) मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत दोन्ही संघासाठी मालिकेतील तिसरा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
मात्र, दुसरा सामना सुरू झाला त्यावेळी म्हणजेच रात्री ७:३० वाजता हा सामना सुरू होणार नाही. अशा स्थितीत सामना भारतीय वेळेनुसार कधी सुरू होणार हे येथे जाणून घ्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना बुधवारी (१३ नोव्हेंबर) होणार आहे. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये हा सामना रंगणार आहे.
हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता खेळला जाईल. या सामन्यात ८ वाजता नाणेफेक होणार आहे. दरम्यान, मालिकेतील दुसरा सामना ७:३० वाजता सुरू झाला होता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना भारतीय चाहत्यांना स्पोर्ट्स १८ च्या विविध चॅनल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन- संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई/यश दयाल, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, नाकाबा पीटर आणि ओटनीएल बार्टमन.