IND vs SA 3rd T20 Playing XI : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज (१३ नोव्हेंबर) सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल.
भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज आवेश खानच्या जागी अष्टपैलू रमनदीप सिंगचा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे रमणदीप सिंग भारताकडून पदार्पण करत आहे.
भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या याने रमणदीप सिंगला पदार्पणाची कॅप दिली. याआधी रमणदीप सिंगने देशांतर्गत आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चांगलीच छाप पाडली होती. याशिवाय तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को या्नसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिपामला.
एकूण T20 सामने : २९
भारत विजयी : १६
दक्षिण आफ्रिका विजयी : १२
अनिर्णित : १
एकूण T20 सामने : १७
विजयी : ११
पराभूत : ५
अनिर्णित : १