मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA 2nd Test : टीम इंडिया कसोटी मालिका हरणार? केपटाऊनमध्ये असं आहे भारताचं रेकॉर्ड

IND vs SA 2nd Test : टीम इंडिया कसोटी मालिका हरणार? केपटाऊनमध्ये असं आहे भारताचं रेकॉर्ड

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 31, 2023 06:47 PM IST

team india record in capetown : केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर भारताचा रेकॉर्ड चांगला नाही. या मैदानावर टीम इंडियाने अद्याप दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.

India vs South Africa 2nd test
India vs South Africa 2nd test (PTI)

India vs South Africa 2nd test : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. हा सामना ३ जानेवारीपासून रंगणार आहे.

या सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार सराव सुरू केला आहे. संघ पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. 

विशेष म्हणजे, केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर भारताचा रेकॉर्ड चांगला नाही. या मैदानावर टीम इंडियाने अद्याप दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.

अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला केपटाऊनमध्ये इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाला येथे पहिली कसोटी जिंकण्याची चांगली संधी आहे.

भारताने केपटाऊनमध्ये आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले आहेत. यात टीम इंडियाला ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत. 

टीम इंडियाकडे विराट कोहली, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरसारखे दिग्गज खेळाडू आहेत. मात्र तरीही मागच्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. सेंच्युरियन कसोटीत केएल राहुलने पहिल्या डावात शतक झळकावले होते. मात्र दुसऱ्या डावात तो ४ धावा करून बाद झाला.

टीम इंडियाने केपटाऊनमध्ये पहिला कसोटी सामना १९९३ मध्ये  खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना अनिर्णित राहिला. यानंतर १९९७ मध्ये झालेल्या सामन्यात भारताला २८२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 

यानंतर २००७ साली झालेल्या केपटाउन कसोटीत टीम इंडियाचा ५ विकेट्सनी पराभव झाला होता. २०११ मध्ये झालेला सामना अनिर्णित राहिला. तर २०१८ आणि २०२२ मधील केपटाउनच्या मैदानावर झालेले सामने भारताने गमावले. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ केपटाऊनमध्ये भिडणार आहेत.

 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi