IND vs SA : भारताची प्रथम फलंदाजी, अक्षर पटेलचं पुनरागमन, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA : भारताची प्रथम फलंदाजी, अक्षर पटेलचं पुनरागमन, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

IND vs SA : भारताची प्रथम फलंदाजी, अक्षर पटेलचं पुनरागमन, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Nov 08, 2024 08:19 PM IST

India vs South Africa, 1st T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना आज डरबन येथे खेळला जात आहे.

IND vs SA : भारताची प्रथम फलंदाजी, अक्षर पटेलचं पुनरागमन, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
IND vs SA : भारताची प्रथम फलंदाजी, अक्षर पटेलचं पुनरागमन, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना आज डरबन येथे खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

टॉसनंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, की आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. खेळपट्टी चांगली दिसत असून आम्ही चांगली धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू. संघातील इतर खेळाडूंनी माझे काम सोपे केले आहे कारण ते ज्या पद्धतीने आपापल्या फ्रँचायझींसाठी निडर स्वभावाने क्रिकेट खेळत आहेत, तीच पद्धत त्यांनी राष्ट्रीय संघासाठी अवलंबली आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान, वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.

भारत-दक्षिण आफ्रिका हेड टू हेड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आत्तापर्यंत ९ द्विपक्षीय T20 मालिका खेळल्या गेल्या आहेत. या दरम्यान भारताने ४ आणि आफ्रिकेने २ विजय मिळवले आहेत. तर ३ मालिका अनिर्णित राहिल्या. ऑक्टोबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या द्विपक्षीय टी-20 मालिकेत भारतीय संघाला अखेरचा पराभव स्वीकारावा लागला होता.

तेव्हापासून भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ टी-20 मालिका खेळल्या आणि एकही गमावली नाही. या दरम्यान  भारताने २ मालिका जिंकल्या. तर तीन टी-२० मालिका अनिर्णित राहिली. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १० वी द्विपक्षीय T20 मालिका खेळवली जात आहे.

एकूण T20 सामने: २७

भारत विजयी : १५

दक्षिण आफ्रिका विजयी : ११

अनिर्णित: १

Whats_app_banner