
India vs Pakistan Score, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आज (२३ फेब्रुवारी) भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल.
पाकिस्तानी संघात एक बदल करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर फखर जमान याला दुखापत झाली होती. यामुळे फखर स्पर्धेतून बाहेर पडला.
फखरच्या जागी सलामीवीर इमाम उल हक या सामन्यात खेळत आहे. भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. जो संघ बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळायला आला होता तोच संघ या सामन्यात खेळत आहे.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन: इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारताने एकूण ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताने ६ सामने जिंकले आहेत तर फक्त १ सामना गमावला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ६ पैकी ५ सामने जिंकले आहेत.
दुबईच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर ती फलंदाजांना अधिक मदत करते. तथापि, येथे फिरकीपटूंची भूमिका मोठी असते कारण मधल्या फळीत धावा काढणे येथे कठीण काम असते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३२५ धावांपर्यंत मजल मारली तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढेल.
संबंधित बातम्या
