
Champions Trophy 2025 IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महामुकाबला आज (२३ फेब्रुवारी) दुबईच्या आतंरराष्ट्रीय स्टेडिमयवर रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियाने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध विजय नोंदवला होता.
तर पाकिस्तानला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यासाठी पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकतात. तर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कदाचित कोणताही बदल होणार नाही.
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला ताप आहे. या कारणास्तव तो सराव सत्राचा भाग नव्हता. पंत पहिल्या सामन्यातही खेळला नव्हता. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल पाकिस्तानविरुद्धही मैदानात उतरू शकतो.
प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. बांगलादेशविरुद्ध राहुलने ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. त्याने शुभमन गिलसोबत चांगली भागीदारीही केली.
भारतासाठी कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल सलामीला खेळेल. गिलने शतक झळकावले होते. त्याने बांगलादेशविरुद्ध नाबाद १०१ धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीही भारतासाठी महत्त्वाच्या भूमिका बजावू शकतात. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिक पांड्याचे स्थान जवळपास निश्चित आहे.
पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. आता संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून मैदानात उतरू शकतो. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांचे संघात स्थान जवळपास निश्चित झाले आहे. मोहम्मद रिझवान संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तर फखर जमान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी इमाम उल हक याची संघात एन्ट्री झाली आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.
पाकिस्तानः इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.
संबंधित बातम्या
