टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका २-० अशी गमावली आहे. आता यानंतर मालिकेतील शेवटची कसोटी मुंबईत १ नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. मायदेशातच भारतीय संघाला पाहुण्या संघाच्या गोलंदाजांच्या विशेषत: फिरकी गोलंदाजांच्या बॉलिंगला तोंड देण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. आता तिसऱ्या कसोटीतही फिरकीला अनुकूल खेळपट्टी असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, हा कसोटी सामनाही टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. कारण या मालिकेनंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. अशा स्थितीत विराट-रोहितला मुंबई कसोटीतून फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करतील. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे अनुभवी फलंदाज या कसोटी मालिकेत आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत.
बेंगळुरू येथील पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज अचूक लाईन आणि उसळत्या चेंडूंना बळी पडले, तर पुण्यातील दुसऱ्या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने दोन डावांत १३ बळी घेतले. मिचेल सँटनरच्या फिरकी चेंडूंना भारतीय फलंदाजांकडे उत्तर नव्हते.
दरम्यान, हे स्पष्ट आहे की टीम इंडियाला पुढच्या मालिकेसाठी या कसोटीतून चांगली तयारी करून घ्यायची आहे. याबाबत भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर म्हणाले की, फिरकीपटूंच्या हातावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
फलंदाजांना हे समजून घेणे आवश्यक आहे की जेव्हा काही चेंडू टर्न घेतात आणि काही चेंडू सरळ जातात तेव्हा ते तुमच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतात. यावेळी, फलंदाजाने बॉल हातातून कसा निघतो आहे, कोणता चेंडू सरळ जाईल आणि कोणता अधिक फिरेल हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.
विशेष म्हणजे, मुंबई कसोटीपूर्वी भारताने २५ नेट बॉलर्सना बोलावले, ज्यात स्थानिक फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांचे चांगले मिश्रण होते. त्यांनी वरिष्ठ खेळाडूंना सुमारे ३ तास सराव करायला लावला. गोलंदाज मोहम्मद सिराजसह भारतीय संघातील जवळपास प्रत्येक सदस्याने दीर्घकाळ फलंदाजी केली. सिराज कोहलीच्या बॅटने खेळायला आला आणि त्याने काही मोठे फटके मारले.े
संबंधित बातम्या