India vs New Zealand, Final Todays Match : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची फायनल आज (९ मार्च) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल.
अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय संघ त्याच प्लेइंग-११ सह मैदानात उतरेल.
या सामन्यात भारतीय संघ ४ विशेषज्ञ फलंदाज, १ यष्टीरक्षक फलंदाज, १ फलंदाजी अष्टपैलू, २ फिरकी गोलंदाजी अष्टपैलू, १ विशेषज्ञ वेगवान गोलंदाज आणि २ विशेषज्ञ फिरकीपटूंसह मैदानात उतरला आहे.
तर दुसरीकडे, किवी संघात वेगवान गोलंदाज नॅथन स्मिथ प्लेइंग इलेव्हनमध्ये आला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्री दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर आहे. न्यूझीलंडसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेम्सन, विल्यम ओ'रूर्क.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण ११९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ६१ वेळा भारतीय संघ विजयी झाला आहे. न्यूझीलंडने ५० वेळा जिंकले आहेत, ७ सामन्यांचा निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत संपला. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला होता.
संबंधित बातम्या