India vs New zeland Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (९ मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. याआधी टीम इंडियाने ग्रुप स्टेज मॅचमध्ये न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने ५ विकेट घेतल्या होत्या.
त्याचवेळी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत चांगली खेळी केली होती. मात्र, भारतीय चाहत्यांना फलंदाजीत विराट कोहली आणि श्रेयस अय्यरकडून तसेच गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. या तिघांनीही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
वरुण चक्रवर्ती याने आतापर्यंत या स्पर्धेतील २ सामन्यात ७ फलंदाज बाद केले आहेत. चक्रवर्तीची सरासरी १३ आहे. त्यामुळे वरुण चक्रवर्ती हा न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी मोठा धोका ठरू शकतो. वरुण चक्रवर्ती याला खेळणे किवी फलंदाजांसाठी सोपे जाणार नाही.
सध्या सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वरुण चक्रवर्ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर या गोलंदाजाने सर्वात कमी फक्त २ सामने खेळले आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने आतापर्यंत या स्पर्धेत २१७ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने आतापर्यंत या स्पर्धेत २१७ धावा केल्या आहेत.
याशिवाय श्रेयस अय्यर भारतासाठी मधल्या फळीत सतत धावा करत आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील ४ सामन्यात श्रेयस अय्यरने ४८.७५ च्या सरासरीने १९५ धावा केल्या आहेत. आता न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर मोठी भूमिका बजावू शकतो.
विशेषत: दुबईची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असेल तर श्रेयस अय्यर याची भूमिका मोठी होईल. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की भारत-न्यूझीलंड फायनलमध्ये फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत मिळू शकते. असे झाल्यास भारतीय मधल्या फळीत श्रेयस अय्यरची भूमिका महत्त्वाची ठरेल.
संबंधित बातम्या