भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. स्पर्धेचा आज (१९ ऑक्टोबर) चौथा दिवस आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद ४६२ धावा केल्या. एकेकाळी भारतीय संघाची धावसंख्या तीन विकेट्सवर ४०८ धावा होती, मात्र सर्फराज खान बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चौथ्या दिवशी (१९ ऑक्टोबर) खेळाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद शुन्य धावा केल्या होत्या. टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे क्रीजवर आहेत. न्यूझीलंड विजयाच्या १०७ धावांनी मागे आहे, तर भारताला १० विकेट्सची गरज आहे.
भारताने दुसऱ्या डावात ४६२ धावा केल्या. एके काळी भारतीय संघाची धावसंख्या तीन विकेटवर ४०८ धावा होती, मात्र सर्फराज खान बाद झाल्यानंतर सातत्याने विकेट पडत राहिल्या. भारताने ५४ धावांत ७ विकेट गमावल्या. पहिल्या डावात भारताच्या ४६ धावांना प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने ४०२ धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंड संघाला ३५६ धावांची मोठी आघाडी मिळाली. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक १३४ धावांची खेळी खेळली.
त्यानंतर भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ गड्यांच्या मोबदल्यात २३१ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी सकाळी टीम इंडियाने आपला स्कोअरबोर्ड २३१ धावांवरून पुढे सरकवला. सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांच्यात १७७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाल्याने चौथ्या दिवसाची पहिली दोन सत्रे भारताच्या नावावर राहिली. सर्फराजने १५० धावा केल्या, तर ऋषभ पंत ९९ धावा करून बाद झाला.
सर्फराज खानची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाची बॅटिंग स्ट्रगल मोडमध्ये गेली. परिस्थिती अशी होती की भारताने शेवटच्या ७ विकेट केवळ ५४ धावांत गमावल्या. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात केएल राहुल मॅट हेन्री आणि विल्यम ओरूर्कच्या घातक गोलंदाजीसमोर केवळ १२ धावा करू शकला.
रवींद्र जडेजालाही केवळ ५ धावा करता आल्या. अशाप्रकारे टीम इंडियाचा दुसरा डाव ४६२ धावांवर आटोपला.
न्यूझीलंडसमोर केवळ १०७ धावांचे लक्ष्य आहे, पण हे लक्ष्य गाठणे न्यूझीलंडला प्रचंड कठीण जाणार आहे. कारण चौथ्या पीच गोलंदाजांना मदत करताना दिसत आहे. अशा स्थितीत जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्यासमोर शेवटच्या दिवशी खरी कसोटी लागणार आहे.
संबंधित बातम्या