मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडला २०१ धावांनी नमवलं

अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडला २०१ धावांनी नमवलं

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 25, 2024 09:11 PM IST

U19 World Cup 2024: या विजयामुळे भारताने पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

U19 World Cup 2024
U19 World Cup 2024

U19 World Cup 2024: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. भारताने पहिल्याच सामन्यात आशियाई चॅम्पियन बांगलादेशचा पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा २०१ धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारत पुढच्या फेरीत खेळणार असल्याचे निश्चित झाले.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात सात विकेट गमावून ३०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आयरिश संघ २९.४ षटकात केवळ १०० धावा करू शकला आणि भारताने हा सामना २०१ धावांनी जिंकला.भारताकडून मुशीर खानने सर्वाधिक ११८ धावांची खेळी केली. भारताचा कर्णधार उदय सहारनने ७५ धावा केल्या. तर, नमन तिवारीने बॉलसह चार विकेट्स घेतल्या. सॅमी पांडेने तीन विकेट घेतल्या.

आयर्लंडकडून डॅनियल फोर्किनने सर्वाधिक २७ धावा केल्या. त्यांच्याशिवाय ऑलिव्हर रिले (१५ धावा), रायन हंटर (१३ धावा) आणि जॉर्डन नील (११ धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आयर्लंडच्या ऑलिव्हर रिलेने तीन आणि जॉन मॅकनॅलीने दोन विकेट घेतल्या.

 

आयर्लंडविरुद्ध भारताची प्लेईंग इलेव्हन:

आदर्श सिंह, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकिपर), सचिन धस, मुरुगन अभिषेक, धनुष गौडा, सौम्य पांडे, नमन तिवारी.

 

भारताविरुद्ध आयर्लंडची प्लेईंग इलेव्हन:

जॉर्डन नील, रायन हंटर (विकेटकिपर), कियान हिल्टन, फिलिपस ले रॉक्स (कर्णधार), स्कॉट मॅकबेथ, जॉन मॅकनॅली, कार्सन मॅककुलो, ऑलिव्हर रिले, मॅकडारा कॉस्ग्रेव्ह, डॅनियल फोर्किन, फिन लुटन.

WhatsApp channel

विभाग

For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi