IND vs ENG 4th T20 Pune Match Tickets : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. उभय संघांमधला पहिला टी-२० सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे फार पूर्वीच विकली गेली होती.
तुम्हाला या मालिकेतील सामन्यांचा थेट स्टेडियममधून आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही पुण्यात होणाऱ्या सामन्याची तिकिटे खरेदी करू शकता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना २५ जानेवारी रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्याच्या तिकिटांची विक्रीही झाली आहे. तिसरा टी-20 सामना २८ जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.
या सामन्याच्या तिकिटांचीही विक्री झाली आहे. मालिकेतील चौथा टी-20 सामना ३१ जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. आता या सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरु झाली आहे.
या मालिकेच्या सामन्यांची तिकिटे वेगाने विकली जात आहेत. चाहत्यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे आता ते पुण्यात होणाऱ्या सामन्याची तिकिटे खरेदी करू शकतात. या सामन्याची तिकिटे वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही स्टेडियममध्ये जाऊन ऑफलाइन तिकीटही काढू शकता.
पुण्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टी-20 चे सर्वात स्वस्त तिकीट १२०० रुपये आहे. सर्वात महाग तिकीट सुमारे २० हजार रुपयांना मिळणार आहे. तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन तिकीट खरेदी करू शकता किंवा स्टेडियममध्ये जाऊन तिकीट खरेदी करू शकता. वेबसाइटवर सर्वात स्वस्त तिकीट १२०० रुपये आहे. बाकी तुम्ही स्टेडियममध्ये जाऊन सर्वात स्वस्त तिकीट दर जाणून घेऊ शकता.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर , ध्रुव जुरेल.
बेन डकेट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, जेकब बेथॉल, लियाम लिव्हिंगस्टोन, जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, आदिल रशीद, ब्रायडन कार्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, रेहान अहमद, साकिब महमूद.
संबंधित बातम्या