भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी-20 सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या (२२ जानेवारी) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. या सामन्याला सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात होईल.
तीन वर्षांनंतर ईडन गार्डनमध्ये टी-20I सामना आयोजित केला जात आहे. अशा परिस्थितीत बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) पहिल्या T20I सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. या मैदानावर शेवटचा T20I सामना २० फेब्रुवारी २०२२ रोजी खेळला गेला होता.
भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. तसेच, टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांचा आनंद घेता येईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20I मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवले जातील. याच्या अर्धा तास आधी म्हणजे ६.३० वाजता टॉस होईल. या T20I मालिकेनंतर दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतील.
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
इंग्लंड: इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.
भारत- इंग्लंड पहिला टी-20 सामना- कोलकाता
भारत- इंग्लंड दुसरा टी-20 सामना- चेन्नई
भारत- इंग्लंड तिसरा टी-20 सामना- राजकोट
भारत- इंग्लंड चौथा टी-20 सामना- पुणे
भारत- इंग्लंड पाचवा टी-20 सामना- मुंबई
संबंधित बातम्या