India vs England ODI Series Full Schedule : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांची मालिका २२ जानेवारीपासून सुरू झाली. या टी-20 मालिकेत इंग्लंडला फक्त एकच विजय नोंदवता आला, परिणामी भारताने मालिका ४-१ अशी जिंकली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग चौथाटी-20 मालिका विजय आहे.
आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आधी भारतीय संघाचे लक्ष इंग्लंडविरुद्धचया तीन वनडे सामन्यांची मालिका जिंकण्यावर असेल. भारत आणि इंग्लंड जुलै २०२२ नंतर प्रथमच वनडे मालिकेत आमनेसामने येणार आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना ६ फेब्रुवारीला नागपुरात, दुसरा सामना ९ फेब्रुवारीला कटकमध्ये आणि शेवटचा एकदिवसीय सामना १२ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत-इंग्लंड पहिला वनडे – ६ फेब्रुवारी (नागपूर)
भारत-इंग्लंड दुसरा वनडे - ९ फेब्रुवारी (कटक)
भारत-इंग्लंड तिसरा वनडे – १२ फेब्रुवारी (अहमदाबाद)
भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासावर नजर टाकली तर गेल्या ६ वर्षात इंग्लंडला एकाही वनडे मालिकेत भारताला हरवता आलेले नाही. २०१८ मध्ये इंग्लंडने टीम इंडियाला शेवटच्यावेळी वनडे मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान दोन एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या आणि दोन्ही वेळा भारतीय संघाने विजय मिळवला.
एकदिवसीय मालिकेत सर्वांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर असतील. दोघांचा एकदिवसीय रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, पण धावा करण्याच्या बाबतीत गेले एक वर्ष त्यांच्यासाठी चांगले राहिले नाही.
वनडे मालिकेसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
संबंधित बातम्या