मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG 5th Test : टीम इंडियाने उडवला ‘बॅझबॉल’चा धुव्वा, इंग्लंडने कसोटी मालिका ४-१ ने गमावली

IND vs ENG 5th Test : टीम इंडियाने उडवला ‘बॅझबॉल’चा धुव्वा, इंग्लंडने कसोटी मालिका ४-१ ने गमावली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 09, 2024 03:31 PM IST

india vs england 5th test Highlights : धर्मशाला कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारताने मालिका ४-१ ने जिंकली. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २१८ धावांत सर्वबाद झाला होता, यानंतर त्यांचा दुसरा डावही १९५ धावांत आटोपला.

IND vs ENG 5th Test : टीम इंडियाने उडवला ‘बॅझबॉल’चा धुव्वा, इंग्लंडने कसोटी मालिका ४-१ ने गमावली
IND vs ENG 5th Test : टीम इंडियाने उडवला ‘बॅझबॉल’चा धुव्वा, इंग्लंडने कसोटी मालिका ४-१ ने गमावली (REUTERS)

धरमशाला कसोटी भारताने एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली आहे. अशा प्रकारे भारताने ५ कसोटी सामन्यांची मालिका ४-१ ने खिशात घातली. 

धरमशाला कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २१८ धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या आणि २५९ धावांची आघाडी घेतली. यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांवर गारद झाला

इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात फक्त जो रूटने मोठी खेळी केली. बाकीचे फलंदाज क्रीजवर टिकू शकले नाहीत. भारताकडून रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहला २ विकेट मिळाले. तर कुलदीप यादवने २ बळी घेतले. रवींद्र जडेजाही एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला. 

रोहित ब्रिगेडने धरमशाला कसोटी सामना जिंकून अनेक विक्रम केले. विशेष म्हणजे अश्विनने आपल्या १००व्या कसोटीत ९ विकेट घेतल्या, तर पदार्पणाच्या कसोटीतही त्याने एकूण ९ विकेट घेतल्या.

भारताने मालिकेतील पहिला सामना गमावला होता. यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन केले आणि मालिका जिंकली.

इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या डावातही फ्लॉप ठरले. आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेल्या अश्विनने बेन डकेटला बाद करत इंग्लंडची सुरुवात खराब केली. यानंतर अश्विनने जॅक क्रोली आणि ऑली पोपला बाद केले. हे तिन्ही फलंदाज ३६ धावापर्यंत बाद झाले. त्यानंतर जॉनी बेअरस्टोने आपली १०० वी कसोटी संस्मरणीय करण्यासाठी काही शॉट्स खेळले, पण तो कुलदीपच्या फिरकीत अडकला आणि एलबीडब्ल्यू झाला.

यानंतर उपाहारापूर्वी आर अश्विनने इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सलाही अवघ्या २ धावांवर बाद केले. उपाहारानंतरही अश्विनची जादू कायम होती. त्याने इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फॉक्सला बाद केले.

टॉम हार्टली (२०) आणि जो रूट यांच्यात छोटीशी भागीदारी झाली. पण बुमराहने हार्टलीला बाद केले. यानंतर दोन चेंडू खेळल्यानंतर मार्क वुडही बाद झाला. वुड बाद झाल्यानंतर शोएब बशीरने जो रूटसोबत ४८ धावा जोडल्या. मात्र बशीर बाद झाल्यानंतर जो रूटचाही संयम सुटला आणि तो ८४ धावांवर बाद झाला.

भारताची पहिल्या डावात शानदार फलंदाजी

धर्मशाला कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव खेळण्याच्या पहिल्या दिवशी २१८ धावांवर आटोपला. यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने शानदार शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर रोहितने १०३ धावांची खेळी केली, तर शुभमन गिलने ११० धावांची खेळी खेळली. मधल्या फळीत देवदत्त पडिकलने ६५ धावा केल्या तर सर्फराज खान ५६ धावा करण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडकडून शोएब बशीरने या डावात ५ तर जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टलीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

IPL_Entry_Point