मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : हीरो नहीं बनने का,' हेल्मेट पहनने का… कॅप्टन रोहितनं युवा सरफराजला झापलं

Video : हीरो नहीं बनने का,' हेल्मेट पहनने का… कॅप्टन रोहितनं युवा सरफराजला झापलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 26, 2024 01:09 PM IST

Rohit Sharma Sarfaraz Khan : सरफराज हेल्मनेट न घालता क्लोज इन पोझिशनमध्ये फिल्डींगसाठी उभा होता. हे पाहून रोहितने सरफराजला फटकारले. यानंतर सरफराज हेल्मेट घालून फिल्डिंगला आला.

Rohit Sharma Sarfaraz Khan
Rohit Sharma Sarfaraz Khan (X)

India vs England 4th Test, Sarfaraz Khan : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने भारताला १९२ धावांचे लक्ष्य दिले आहे. आज (२६ फेब्रुवारी) सामन्याचा चौथा दिवस आहे.

दरम्यान, या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यानचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्मा सहकारी खेळाडू सरफराज खानवर थोडा चिडलेला दिसला.

युवा सरफराज हेल्मनेट न घालता क्लोज इन पोझिशनमध्ये फिल्डींगसाठी उभा होता. हे पाहून रोहितने सरफराजला फटकारले. यानंतर सरफराज हेल्मेट घालून फिल्डिंगला आला.

ही संपूर्ण घटना इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ४७ व्या षटकात घडली. तेव्हा कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूआधी रोहितने मिड-ऑफवरून सरफराजला सिली मिड-ऑफवर क्षेत्ररक्षणासाठी बोलावले. रोहितच्या सांगण्यावरून सरफराज लगेच सिली मिड-ऑफवर आला. पण यावेळी त्याच्याकडे हेल्मेट नव्हते, तो तसाच हेल्मेट न घालता फिल्डिंगसाठी उभा राहिला. हे पाहून रोहितने खेळ थांबवला आणि म्हणाला, ओए, हीरो नहीं बनने का.' हेल्मेट पहनने का."

यानंतर अंपायर कुमार धर्मसेना यांनीही सरफराजला हेल्मेट घालण्यास सांगितले. क्लोज इन पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षण करताना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे.

दरम्यान, या प्रसंगानंतर दिल्ली पोलिसांनीदेखील एक खास ट्विट केले आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना दिल्ली पोलिसांनी लिहिले की, 'टू-व्हीलरपर हीरो नहीं बनने का.' हमेशा हेल्मेट पहनने का."े

IPL_Entry_Point