India Playing XI Vs England 4th T20 : भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (३१ जानेवारी) पुण्यात खेळला जाणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता सामना सुरू होईल.
राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० मध्ये भारताने स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र या सामन्यात भारताला २६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत टीम इंडिया या सामन्यात काही मोठे बदल करू शकते.
रिंकू सिंगबाबत अधिकृत अपडेट समोर आले आहे. तो चौथ्या टी-20 सामन्यात खेळणार आहे. रिंकू पूर्णपणे फिट नसल्याने पहिल्या टी-२० नंतर तो संघाबाहेर नव्हता. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली होती, मात्र मॅच फिनिशरची भूमिका निभावण्यात जुरेल अपयशी ठरला.
पुण्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टी-२० मध्ये शिवम दुबेलाही संधी मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक, भारतीय खेळाडू इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीदविरुद्ध धडपडत आहेत. अशा परिस्थितीत शिवम दुबेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दुबे फिरकीपटूंवर आक्रमण करण्यास सक्षम आहे.
एकूणच, भारतीय संघ चौथ्या टी-२० मध्ये तीन बदलांसह खेळू शकतो. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला संघातून वगळले जाऊ शकते.
याशिवाय लेगस्पिनर रवी बिश्नोई यालाही वगळले जाऊ शकते. या दोघांशिवाय ध्रुव जुरेल यालाही डच्चू मिळू शकतो. या तिघांच्या जागी अर्शदीप सिंग, रिंकू आणि शिवम दुबे यांना संधी मिळू शकते.
चौथ्या टी-20 साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे/रमनदीप सिंग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.
संबंधित बातम्या