मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Eng Test : सरफराज-पाटीदार खेळणार, गिल-अय्यरचं काय होणार? दुसऱ्या कसोटीसाठी कशी असेल टीम इंडिया? पाहा

Ind vs Eng Test : सरफराज-पाटीदार खेळणार, गिल-अय्यरचं काय होणार? दुसऱ्या कसोटीसाठी कशी असेल टीम इंडिया? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 01, 2024 11:07 AM IST

Ind vs Eng Test Playing 11 : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार हे निश्चित आहे. कारण रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी कोणत्या खेळाडूला स्थान मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Ind vs Eng Test Playing 11
Ind vs Eng Test Playing 11 (ANI)

India Vs England 2nd Test Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा सामना २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत दुसऱ्या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे. 

मात्र, याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर प्लेइंग इलेव्हन निवडण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये  काही बदल होणार हे निश्चित आहे. कारण रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी कोणत्या खेळाडूला स्थान मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

सरफराज की पाटीदार?

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सरफराज खानचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. रजत पाटीदार आधीच संघात होता. हे दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिर केली आहे. अशा स्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला खेळवायचे, हा मोठा प्रश्न आहे. 

टीम इंडियासाठी शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर कसोटी फॉरमॅटमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहेत. गेल्या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी घोर निराशा केली. अशा परिस्थितीत या दोघांना दुसऱ्या सामन्यात स्थान मिळणार का? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. 

गिल-अय्यरचं काय होणार?

गिल आणि अय्यर यांच्या कसोटी आकड्यांवर नजर टाकली तर गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी खूपच खराब झाली आहे. शुभमन गिलला गेल्या ११ डावात एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. तर अय्यरलाही गेल्या १० डावांत एकही अर्धशतक करता आलेले नाही. ही आकडेवारी लक्षात घेऊन या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवून नव्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

अशी शक्यता कमी असली तरी, असे झाल्यास सर्फराज आणि रजत पाटीदार या दोघांनाही टीम इंडियासाठी कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल/रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सरफराज खान/रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi