भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज (९ फेब्रुवारी) कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले आहेत. तर आज भारताकडून मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. तसेच, विराट कोहलीही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.
दुसरीकडे या सामन्यात इंग्लंडकडून तीन बदल करण्यात आले. या सामन्यात मार्क वुड, गस ऍटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. या सामन्यात जेकब बेथेल, ब्रेडन कार्स आणि जोफ्रा आर्चर यांना संधी मिळाली नाही.
इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन- फिल सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद.
भारताची प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
कटक एकदिवसीय सामन्यात उजव्या हाताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती भारताकडून एकदिवसीय पदार्पण करत आहे. वरुणला अष्टपैलू रवींद्र जडेजाने कॅप दिली. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरुणने १४ विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीनंतर त्याचा वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला.
कुलदीप यादवच्या जागी वरुणचा प्लेईंग-११ मध्ये समावेश आला. विराट कोहलीही फिट झाल्यानंतर या सामन्यात खेळायला आला आहे. अशा स्थितीत यशस्वी जैस्वाल यांना बाहेर बसावे लागले.
संबंधित बातम्या