Floodlights Go Off At Cuttack : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना कटक येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाच्या डावादरम्यान एक विचित्र प्रकार घडला. बाराबती स्टेडिमयमधील दिवे अचानक बंद झाले.या स्टेडियमच्या फ्लडलाइट अचानक खराब झाल्या. त्यामुळे मैदानावरील प्रकाश कमी झाला. दिवे गेल्याने बराच वेळ सामना थांबवावा लागला.
काही काळानंतर खेळ पुन्हा सुरु झाला आणि रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. हे वृत्त लिहिपर्यंत रोहित शर्मा ३४ चेंडूत ५४ धावांवार खेळत होता.
तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारताला ३०५ धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाची स्फोटक सुरुवात झाली.
इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने ६.१ षटकात बिनबाद ४८ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा १८ चेंडूत २९ धावांवर होता, तेव्हा अचानक स्टेडियमची एक फ्लडलाईट बंद झाली.
वास्तविक, भारतीय डावाच्या सहाव्या षटकात फ्लडलाइटमध्ये समस्या आली. त्यामुळे सामना काही काळ थांबला होता. मात्र यानंतर लाईट लागताच सामना पुन्हा सुरु झाला. पण एकच चेंडू पडल्यानंतर पुन्हा लाइटमध्ये बिघाड झाला. त्यामुळे सामना मध्यंतरी थांबवावा लागला. हे पाहून टीम इंडियाचे खेळाडू मैदानाबाहेर पडले. इंग्लंडचे खेळाडूही मैदानाबाहेर गेले.
फ्लडलाईटच्या समस्येमुळे सामना थांबला. त्यामुळे संतप्त चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. टीम इंडियाच्या चाहत्यांनी X वर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.
या सामन्यात इंग्लंडने भारताला ३०५ धावांचे लक्ष्य दिले आहे. बेन डकेट आणि जो रूट यांनी संघासाठी चमकदार कामगिरी केली. या दोघांनी अर्धशतके झळकावली. डकेट ६५ धावा करून बाद झाला. रुट ६९ धावा करून बाद झाला. जोस बटलरने ३४ धावांचे योगदान दिले. अशा प्रकारे संपूर्ण संघ ५०व्या षटकात ३०४ धावा करून ऑल आऊट झाला.
रवींद्र जडेजाने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने १० षटकात ३५ धावा देत ३ बळी घेतले. यानंतर वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या