मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG 1st Test : हैदराबाद कसोटीसाठी बेन स्टोक्सने ११ शिलेदार निवडले, संघात ३ फिरकीपटू, पाहा

IND vs ENG 1st Test : हैदराबाद कसोटीसाठी बेन स्टोक्सने ११ शिलेदार निवडले, संघात ३ फिरकीपटू, पाहा

Jan 24, 2024 08:41 PM IST

England Playing 11 vs India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून (२५ जानेवारी) सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.

England Playing 11 vs India
England Playing 11 vs India (AP)

England Playing 11 vs India for Hyderbad 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून (२५ जानेवारी) सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, या सामन्यासाठी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

बेन स्टोक्सने आपल्या संघात तीन फिरकीपटू आणि एका वेगवान गोलंदाजाला स्थान दिले आहे. यात लँकेशायरचा टॉम हार्टली कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. त्याचबरोबर रेहान अहमद आणि जॅक लीच या फिरकीपटूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 

जेम्स अँडरसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

तर अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नाही. जेम्स अँडरसनचा हा सातवा भारत दौरा आहे. त्याने आतापर्यंत भारतात खेळल्या गेलेल्या १३ कसोटी सामन्यांमध्ये ३४ बळी घेतले आहेत. 

२०१२ साली इंग्लंडने भारतात कसोटी मालिका जिंकली होती. त्या मालिकेत अँडरसनने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या मालिकेत इंग्लंडने एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा २-१ ने पराभव केला होता. अँडरसनने त्या मालिकेत १२ विकेट घेतल्या होत्या.

जेम्स अँडरसनने आतापर्यंत १८३ कसोटी सामन्यात ६९० विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत ७०० विकेट पूर्ण करण्यासाठी त्याला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

हैदराबाद कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.

हैदराबाद कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्ट केले आहे की, पहिल्या कसोटीत केएल राहुल स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळणार आहे. अशा परिस्थितीत केएस भरत किंवा अनकॅप्ड यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यापैकी एकाला संधी मिळू शकते.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार

टी-२० वर्ल्डकप २०२४