India vs England 1st ODI Scorecard : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (६ फेब्रुवारी) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी २४९ धावांचे लक्ष्य दिले आहे.
या सामन्यात टीम इंडियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा होते, या दोघांनी प्रत्येकी ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फिल सॉल्टनेही इंग्लिश संघाकडून ४३ धावांची शानदार खेळी केली.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी अवघ्या ८ षटकांत संघाची धावसंख्या ७० च्या पुढे नेल्याने हा निर्णय सुरुवातीला चांगलाच ठरला. पण ९व्या षटकात फिल सॉल्ट बाद होताच सामना भारताकडे वळला. फिल सॉल्ट, बेन डकेट आणि हॅरी ब्रूक यांनी आपल्या विकेट अवघ्या २ धावांमध्ये गमावल्या.
इंग्लंडची अवस्था बिनबाद ७५ वरून ३ बाद ७७ धावा अशी झाली होती. अशा स्थितीत कर्णधार जोस बटलरने एका टोकाकडून डाव सावरला, त्याने ६७ चेंडूत ५२ धावा केल्या. पण अक्षर पटेलच्या चेंडूवर तो चुकला आणि हार्दिक पांड्याकडे झेलबाद झाला.
जोस बटलर आणि जेकब बॅचलर यांच्यातील ५९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडचा संघ छोट्या धावसंख्येवर ऑलआऊट होण्यापासून वाचला. बेथेलने ६४ चेंडू खेळून ५१ धावा केल्या. बेथेलचा हा भारताविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना होता.
भारतीय संघाची गोलंदाजी जबरदस्त होती. हर्षित राणा आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
संबंधित बातम्या