मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs CAN : रोहित-जैस्वाल ओपनिंग करणार, कोहली नंबर तीनवर खेळणार? कॅनडाविरुद्ध अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

IND vs CAN : रोहित-जैस्वाल ओपनिंग करणार, कोहली नंबर तीनवर खेळणार? कॅनडाविरुद्ध अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

Jun 15, 2024 12:08 PM IST

india vs canada t20 world cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडिया ग्रुप स्टेजचा चौथा सामना कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो.

IND vs CAN : रोहित-जैस्वाल ओपनिंग करणार, कोहली नंबर तीनवर खेळणार? कॅनडाविरुद्ध अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन
IND vs CAN : रोहित-जैस्वाल ओपनिंग करणार, कोहली नंबर तीनवर खेळणार? कॅनडाविरुद्ध अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन (BCCI-X)

टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय क्रिकेट संघ आज शनिवारी (१५ जून) कॅनडाला भिडणार आहे. टीम इंडियाचा हा ग्रुप स्टेजचा चौथा आणि शेवटचा सामना आहे. याआधी खेळलेले तिन्ही सामने जिंकून टीम इंडिया सुपर-८ साठी पात्र ठरली आहे. 

अशा स्थितीत कॅनडाविरुद्धच्या आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन आणि फलंदाजी क्रमवारीत बदल होऊ शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आज यशस्वी जैस्वालला संधी मिळू शकते आणि कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेले का, हे पाहणेही रंजक ठरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली कर्णधार रोहित शर्मासह सलामीला दिसला आहे. पण किंग कोहलीची बॅट सलामीला कामगिरी करू शकली नाही. सलामीला आलेला विराट कोहली तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहली १ धाव करून बाद झाला होता. यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ ४ धावा करता आल्या आणि त्यानंतर अमेरिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तो गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

अशा स्थितीत कॅनडाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आपला जुना क्रमांक तीनवर खेळताना दिसू शकतो. संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालला संधी मिळू शकते. जैस्वाल सलामीला भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत दिसू शकतो.

जैस्वालला कोणाच्या जागी संधी मिळू शकते?

अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी जैस्वालला संधी मिळू शकते. जडेजाही आतापर्यंत फ्लॉप दिसला आहे. कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीतही जडेजाचा फारसा उपयोग केलेला नाही. अशा स्थितीत जडेजाला कॅनडाविरुद्धच्या सामन्यातून वगळले जाऊ शकते. जडेजाच्या जागी जैस्वालला संघात प्रवेश मिळू शकतो.

कॅनडाविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

WhatsApp channel