IND vs BAN : ३५ वर ५ विकेट पडल्या होत्या, तरी बांगलादेशने केल्या २२८ धावा, तौहिद ह्रदॉयचं शतक, तर शमीचे ५ विकेट
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : ३५ वर ५ विकेट पडल्या होत्या, तरी बांगलादेशने केल्या २२८ धावा, तौहिद ह्रदॉयचं शतक, तर शमीचे ५ विकेट

IND vs BAN : ३५ वर ५ विकेट पडल्या होत्या, तरी बांगलादेशने केल्या २२८ धावा, तौहिद ह्रदॉयचं शतक, तर शमीचे ५ विकेट

Published Feb 20, 2025 06:17 PM IST

India vs Bangladesh Scorecard : चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशशी होत आहे. या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND vs BAN : ३५ वर ५ विकेट पडल्या होत्या, तरी बांगलादेशने केल्या २२८ धावा, तौहिद ह्रदॉयचं शतक, तर शमीचे ५ विकेट
IND vs BAN : ३५ वर ५ विकेट पडल्या होत्या, तरी बांगलादेशने केल्या २२८ धावा, तौहिद ह्रदॉयचं शतक, तर शमीचे ५ विकेट (AFP)

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध सुरू आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बांगलादेशी संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकात सर्वबाद २२८ धावा केल्या. भारताला विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य दिले आहे.

बांगलादेशकडून तौहीद हृदोयने १०० धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीला सर्वाधिक ५ विकेट मिळाले.

एकावेळी बांगलादेशने अवघ्या ३५ धावांत सुरुवातीचे ५ विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर तौहीद हृदोयचे शतक आणि झाकीर अलीच्या अर्धशतकामुळे त्यांनी आपल्या संघाची शान वाचवली. तौहीदने १०० आणि झाकीरने ६८ धावा केल्या.

हृदॉय आणि झाकेर अलीने लाज वाचवली

बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाज आपल्यावर असा वार करतील असे त्याला वाटले नसेल. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने सौम्या सरकारला बाद केले तर दुसऱ्याच षटकात हर्षित राणाने कर्णधार नजमुल हुसेन शांतोला बाद केले.

मेहदी हसनने ५ धावा केल्या आणि मुशफिकुर रहीम खाते न उघडता बाद झाला. परिस्थिती अशी होती की ३५ धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर तौहीद हृदय आणि झाकीर अली यांनी कमान सांभाळत १५४ धावांची शानदार भागीदारी केली. झाकेर अलीने ६८ धावांचे योगदान दिले.

अक्षर पटेल त्याच्या पहिल्याच षटकात घातक गोलंदाजी करताना दिसला. त्याने तनजीद हसन आणि मुशफिकुर रहीमला लागोपाठ दोन चेंडूत बाद केले होते, पण रोहित शर्माने झाकीर अलीचा झेल सोडल्यामुळे अक्षरला त्याची हॅटट्रिक पूर्ण करता आली नाही.

भारताकडून या सामन्यात इतके खराब क्षेत्ररक्षण झाले, की रोहितनंतर हार्दिक पंड्यानेही झेल सोडला. त्याचवेळी केएल राहुलही यष्टिरक्षणात चुका करताना दिसला आणि त्याने एक महत्त्वाची स्टंपिंग मिस केली.

मोहम्मद शमीचा पंजा

भारताकडून मोहम्मद शमीने दमदार गोलंदाजी करत ५ बळी घेतले. त्याने सौम्या सरकार, मेहदी हसन, झाकीर अली, तन्झीम हसन साकीब आणि तस्किन अहमद यांना बाद केले. त्याच्याशिवाय हर्षित राणाने ३ आणि अक्षर पटेलने २ बळी घेतले.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या