IND vs AUS : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया गुलाबी जर्सीत, कारण काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया गुलाबी जर्सीत, कारण काय? जाणून घ्या

IND vs AUS : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया गुलाबी जर्सीत, कारण काय? जाणून घ्या

Jan 05, 2025 07:01 AM IST

IND vs AUS 5th Test : सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ गुलाबी रंगाची जर्सी घालून खेळत आहे. पण आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानेही आपल्या जर्सीमध्ये गुलाबी रंगाचा वापर केला आहे.

IND vs AUS : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया गुलाबी जर्सीत, कारण काय? जाणून घ्या
IND vs AUS : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया गुलाबी जर्सीत, कारण काय? जाणून घ्या

Indian Players Wearing Pink Jersey : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याचा आज (५ डिसेंबर) तिसरा दिवस असून टीम इंडियाचे खेळाडू फलंदाजीसाठी आले, तेव्हा त्यांच्या जर्सीवर गुलाबी रंगाची झलक दिसली. त्यांची नावे आणि जर्सी क्रमांक गुलाबी रंगात लिहिलेला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी भारतीय संघ आपली नियमित जर्सी घालून खेळताना दिसला. मात्र तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू गुलाबी जर्सी घालून मैदानात खेळायला आले.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसापासून गुलाबी जर्सी घालून खेळत आहे. पण, टीम इंडियाने असे करण्यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया?

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी आपल्या कॅप्सवर स्वाक्षरी करून महान ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅकग्रा याला भेट दिली. मॅकग्रा त्याची दिवंगत पत्नी जेन मॅकग्रा हिच्या स्मरणार्थ मॅकग्रा फाऊंडेशन चालवतो, जे स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरुकता वाढवतात.

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाला पिंक डे टेस्ट म्हणतात आणि या दिवशी मॅकग्रा फाउंडेशनसाठी निधी गोळा केला जातो. वर्षातील पहिल्या कसोटीला 'पिंक टेस्ट' म्हणतात आणि या सामन्यात संपूर्ण मैदान गुलाबी रंगात रंगून जाते. खेळाडूंची जर्सी, स्टंप आणि चाहतेही गुलाबी ड्रेस किंवा टोपी घालून मैदानात येतात.

ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय संघ 'पिंक डे'ला गुलाबी जर्सी घालून खेळत आहे. ग्लेन मॅकग्राची पत्नी जेन मॅकग्रा २२ जून २००८ रोजी मरण पावली, परंतु त्यापूर्वी ३ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाने 'मॅकग्रा इन्स्टिट्यूट'ची स्थापना केली होती.

ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचे लक्ष्य

सिडनी कसोटीबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने पहिल्या डावात ४ धावांची आघाडी घेतली होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव १५७ धावांवर आटोपला, त्यामुळे भारताने चौथ्या डावात कांगारू संघाला १६२ धावांचे लक्ष्य दिले आहे. स्कॉट बोलंडने ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण सामन्यात १० विकेट घेतल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या