भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१५ डिसेंबर) दुसरा दिवस आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया आणि केवळ १३.२ षटकांचा खेळ होऊ शकला. यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपली ताकद दाखवत सुरुवातीच्या सत्रात चांगली कामगिरी केली.
दरम्यान, विराट कोहली त्याच्या प्रसिद्ध असलेल्या उर्जेत दिसला आणि गाबा स्टेडियमवरील ऑस्ट्रेलियन चाहत्यांशी भिडला. कोहलीने ऑस्ट्रेलियन चाहत्यांना त्यांच्या कृतीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
वास्तविक, गाब्बामध्ये उपस्थित ऑस्ट्रेलियन चाहते टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला ट्रोल करत होते. ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सिराज आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वाद हे त्याचे कारण होते.
सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन चाहते मोठ्याने सिराजला ट्रोल करत होते. पण मार्नस लॅब्युशेनची विकेट पडताच कोहलीने त्यांना तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला.
नितीश रेड्डी ३४ वे षटक टाकत होता. रेड्डीने या षटकाचा दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, ज्यावर लॅबुशेनने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या काठाला लागून स्लिपमध्ये कोहलीच्या दिशेने गेला, कोहलीने एक अप्रतिम झेल घेतला आणि संघाला मोठे यश मिळवून दिले.
कोहली जेव्हा कॅच घेत आनंद साजरा करत होता तेव्हा त्याने स्टँडमध्ये बसलेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडे बघितले आणि तोंडावर बोट ठेवून त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला. कोहलीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. कोहली त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. तो अशा गोष्टी करत राहतो. तो शांत बसत नाही, सतत काहीतरी करत राहतो.
याआधी भारताला विकेट मिळत नसताना मोहम्मद सिराजने एक युक्ती केली आणि भारताला यश मिळाले. जेव्हा लॅबुशेन स्ट्राइकवर होते, तेव्हा त्याने स्टंपवरील बेल्सची अदलाबदल केली, त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅबुशेन नितीश रेड्डीचा बळी ठरला. लॅबुशेनने ५५ चेंडूत केवळ १२ धावा केल्या.
संबंधित बातम्या