मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अंडर-१९ वर्ल्डकप फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा भिडणार, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

अंडर-१९ वर्ल्डकप फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा भिडणार, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 09, 2024 12:23 PM IST

IND VS AUS U19 Head to Head stats : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल अतिशय रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत अतिशय सुरेख प्रदर्शन केले आहे.

India Vs Australia Under19 World Cup Final
India Vs Australia Under19 World Cup Final

India vs Australia U-19 World Cup 2024 Final : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेला अंडर-१९ विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियन संघांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (११ फेब्रुवारी) बेनोनी येथे खेळवला जाईल.

या स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा थरारक सामन्यात धुव्वा उडवला. तर पहिल्या सेमी फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल अतिशय रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत अतिशय सुरेख प्रदर्शन केले आहे. भारत ९व्यांदा अंंडर १९ वर्ल्डकपच्या फायनल खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. 

तसेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन वेळा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल झाली आहे. या दोन्ही वेळा भारताने बाजी मारली आहे. भारताने आतापर्यंत ५ वेळा अंडर १९ वर्ल्डकप जिंकला आहे.

२०१२ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदा अंडर १९ वर्ल्डकपची फायनल झाली होती. त्यानंतर २०१८ मध्येही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर १९ वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला गेला. या दोन्हीवेळा भारताने फायनल जिंकली आता भारताला हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे.

दोन्ही संघ

भारत : अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे (वीसी), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

ऑस्ट्रेलिया : ह्यू वेबगेन (कर्णधार), लचलान एटकेन, चार्ली अँडरसन, हरकिरत बाजवा, महाली बियर्डमन, टॉम कॅम्पबेल, हॅरी डिक्सन, रायन हिक्स, सॅम कोन्स्टास, राफेल मॅकमिलन, एडन ओ'कॉनर, हरजस सिंग, टॉम स्ट्रेकर, कॅलम विडलर, ओली पीक.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi