Ind vs Aus : ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायचीय? मग टीम इंडियात हे ४ बदल करावेच लागतील, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Aus : ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायचीय? मग टीम इंडियात हे ४ बदल करावेच लागतील, जाणून घ्या

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायचीय? मग टीम इंडियात हे ४ बदल करावेच लागतील, जाणून घ्या

Nov 17, 2024 10:25 AM IST

Ind vs Aus Test News In Marathi : टीम इंडिया २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ गेल्या दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आहे. आता टीम इंडियाकडे हॅट्ट्रिकची संधी आहे.

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायचीय? मग टीम इंडियात हे ४ बदल करावेच लागतील, जाणून घ्या
Ind vs Aus : ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायचीय? मग टीम इंडियात हे ४ बदल करावेच लागतील, जाणून घ्या (AFP)

India vs Australia Test Series : क्रिकेट जगतात सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका चर्चेचा विषय आहे. टीम इंडियाने गेल्या दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र, यावेळी कांगारू बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल, तर आपल्या रणनीतीत ४ बदल करावे लागतील.

अभिमन्यू ईश्वरनच्या जागी साई सुदर्शन

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये संधी मिळालेली नाही. त्याच्या जागी युवा खेळाडू अभिमन्यू इसवरन हा राखीव सलामीवीर म्हणून टीम इंडियाचा भाग आहे. अभिमन्यू ईश्वरन भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळला होता. पण त्याला विशेष काही करता आले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी साई सुदर्शनला संधी देणे अधिक योग्य ठरू शकते.

मोहम्मद शमीचा संघात समावेश करावा लागेल

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने दमदार पुनरागमन केले आहे. शमी ३६० दिवसांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आणि त्याने ७ विकेट घेतल्या. रणजी ट्रॉफीमध्ये तो बंगालकडून मध्य प्रदेशविरुद्ध खेळला होता. भारताला ऑस्ट्रेलियात पुन्हा मालिका जिंकायची असेल तर शमीला संघात परत आणावे लागेल.

रोहित शर्माने पहिली कसोटी खेळावी

कर्णधार रोहित शर्मा २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणारा पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याचे वृत्त आहे. मात्र, १५ नोव्हेंबरलाच रोहित दुसऱ्यांदा वडील झाला. अशा परिस्थितीत तो १८ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. पण तो पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे वृत्त आहे.

पण जर भारताला ऑस्ट्रेलियात मालिका जिंकायची असेल, तर रोहितला पाचही कसोटी सामने खेळावे लागतील, कारण त्याच्या अनुपस्थितीत संघाचा समतोल बिघडू शकतो.

सलामीच्या जोडीत बदल करू नये

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आणि गरज पडल्यास केएल राहुलला सलामीला खेळवले जाईल, असे वृत्त आहे. राहुल हा टॉप ऑर्डर स्पेशालिस्ट फलंदाज असला, आणि त्याने भारतासाठी आधी ओपनिंग केली असली तरी, आता राहुल बराच काळ मधल्या फळीत खेळत आहे. अशा स्थितीत भारताला मालिका जिंकायची असेल तर राहुलचा नंबर बदलू आणि सलामीच्या जोडीत बदल करू नये.

Whats_app_banner