भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये, दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये, तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये, चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये आणि पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवला जाईल.
भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी – सकाळी ७:५० (पर्थ २२ ते २६ नोव्हेंबर)
भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी – सकाळी ९:३० (ॲडलेड ०६ ते १० डिसेंबर)
भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी – सकाळी ५:५० (ब्रिस्बेन १४ ते १८ डिसेंबर)
भारत-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी – पहाटे ५ (मेलबर्न २६ ते ३० डिसेंबर)
भारत-ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी – पहाटे ५ वाजता (सिडनी ०३ ते ०७ जानेवारी)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने-हॉटस्टार ॲपवर पाहता येईल.
या मालिकेतील सर्व सामन्यांसाठी भारताने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मात्र, नियमित कर्णधार रोहित शर्मा पर्थ कसोटी सामना खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी नुकताच संघ जाहीर केला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्रन जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.