ऑस्ट्रेलियन संघ स्लेजिंगसाठी ओळखला जातो. याबाबतीत ऑस्ट्रेलियन खेळाडू खूपच निर्दयी आहेत. विरोधी संघाला आपल्या शब्दात अडकवून त्यांच्याकडून चुका घडवून आणण्याची ऑस्ट्रेलियन संघाची जुनी रणनीती आहे आणि सिडनीमध्ये पुन्हा एकदा तेच पाहायला मिळाले.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताचा शुभमन गिल ऑस्ट्रेलियाच्या या चालीचा बळी ठरला.
गिलला चौथ्या कसोटी सामन्यात वगळण्यात आले. पण पाचव्या कसोटी सामन्यात तो परतला. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. या उजव्या हाताच्या फलंदाजाने चांगली सुरुवात केली होती, पण लंचआधी तो स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांच्या जाळ्यात अडकला आणि नॅथन लायनला त्याची विकेट दिली.
सिडनी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने दोन विकेट्स गमावल्या. केएल राहुल बाद झाला आणि त्याच्यापाठोपाठ यशस्वी जैस्वालही पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर विराट कोहली आणि गिलने डाव सावरला. ही भागीदारी तोडण्यासाठी लॅबुशेन आणि स्मिथने चाली खेळल्या.
नॅथन लायन गोलंदाजी करत असताना लॅबुशेन आणि स्मिथने शुभमन गिल याला त्रास द्यायला सुरुवात केली. गिल त्यांच्या बोलण्याला बळी पडला आणि त्याची विकेट गमावली.
लॅबुशेन : इझी, इझी, इझी… फक्त एका शॉटची गरज आहे.
स्टीव्ह स्मिथ: हा मूर्खपणा आहे. चल खेळ
शुभमन गिल : स्मिथ तू तुझा वेळ घे, तुला कोणी काही बोलत नाही.
स्मिथ: चल खेळ, मित्रा.
लाबुशेन: स्मिथ, तु तुझा वेळ घे.
स्मिथ : तो मी घेईनच
सिडनी कसोटी सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहतील. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही ते स्वत:कडे राखतील.
ही ट्रॉफी गेली १० वर्षे भारताकडे आहे. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली तरी ऑस्ट्रेलिया मालिका जिंकेल आणि ट्रॉफीही आपल्या नावे करेल.
संबंधित बातम्या