रोहित शर्मा पिंक बॉलने प्रॅक्टिस मॅच खेळणार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, सर्व माहिती जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रोहित शर्मा पिंक बॉलने प्रॅक्टिस मॅच खेळणार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, सर्व माहिती जाणून घ्या

रोहित शर्मा पिंक बॉलने प्रॅक्टिस मॅच खेळणार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, सर्व माहिती जाणून घ्या

Nov 29, 2024 10:00 AM IST

india vs australia prime minister xi : टीम इंडियाला ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दुसरा सामना खेळायचा आहे. हा सामना दिवस-रात्र असेल, जो गुलाबी चेंडूने खेळला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडिया आणखी एक सामना खेळणार आहे.

रोहित शर्मा पिंक बॉलने प्रॅक्टिस मॅच खेळणार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, सर्व माहिती जाणून घ्या
रोहित शर्मा पिंक बॉलने प्रॅक्टिस मॅच खेळणार, सामन्याची वेळ, लाईव्ह स्ट्रिमिंग, सर्व माहिती जाणून घ्या (HT_PRINT)

भारतीय संघाने पर्थ कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने दाखवून दिले की हा संघ कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारणारा नाही. पहिल्या डावात १५० धावांत सर्वबाद झाल्याने भारताने हा सामना जिंकून दाखवला.

आता टीम इंडियाला ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दुसरा सामना खेळायचा आहे. हा सामना दिवस-रात्र असेल, जो गुलाबी चेंडूने खेळला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडिया आणखी एक सामना खेळणार आहे.

टीम इंडिया हा सामना ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध खेळणार आहे. हा दोन दिवसीय सराव सामना कॅनबेरा येथे खेळवला जाणार असून हा सामनाही गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. कॅनबेराच्या मनुका ओव्हल मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माही खेळणार आहे.

पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित खेळला नव्हता. मुलाच्या जन्मामुळे तो भारतातच राहिला. 

भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन सामना कधी होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन हा सामना ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन सामना कुठे होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील सामना कोठे पाहता येईल?

भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहता येईल.

भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकता?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण डिस्ने हॉटस्टारवर पाहता येईल.

Whats_app_banner