IND vs AUS ODI : वर्ल्डकपआधी रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया वनडेचा थरार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या
india vs australia odi : एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण १४६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने ८४ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघ ५४ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
india vs australia odi series 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. आगामी आयसीसी वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. बीसीसीआयने नुकतीच ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती.
ट्रेंडिंग न्यूज
पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, मोहालीत दोन्ही संघांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळू शकते. अशा परिस्थितीत मोहालीत कोणत्या संघाचे पारडे जड असेल ते जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण १४६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने ८४ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघ ५४ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. तर १० सामन्यांचा निकाल लागला नाही. म्हणजेच हेड टू हेडमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड राहिले आहे.
भारताला भारतात हरवणं कठीण
पण भारतीय कनडिशन्समध्ये भारताला हरवणे अजिबात सोपे नाही. अशा स्थितीत सामना फिफ्टी-फिफ्टी होऊ शकतो. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली गेली होती. ऑस्ट्रेलियाने ती मालिकाही २-१ ने जिंकली होती.
भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शार्दुल ठाकूर.
ऑस्ट्रेलिय संघ-
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क , मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.