ICC वनडे इव्हेंटच्या बाद फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया ६ वेळा भिडले, कोणी किती सामने जिकले? आकडे पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ICC वनडे इव्हेंटच्या बाद फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया ६ वेळा भिडले, कोणी किती सामने जिकले? आकडे पाहा

ICC वनडे इव्हेंटच्या बाद फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया ६ वेळा भिडले, कोणी किती सामने जिकले? आकडे पाहा

Published Mar 03, 2025 11:21 AM IST

IND vs AUS Semi Final : आयसीसी एकदिवसीय स्पर्धांच्या बाद फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ६ वेळा आमनेसामने आले आहेत. अशाप्रकारे आयसीसी वनडे स्पर्धेच्या बाद फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आता सातव्यांदा भिडणार आहेत.

ND vs AUS Semi Final : ICC वनडे इव्हेंटच्या बाद फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया ६ वेळा भिडले, कोणी किती सामने जिकले? आकडे पाहा
ND vs AUS Semi Final : ICC वनडे इव्हेंटच्या बाद फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया ६ वेळा भिडले, कोणी किती सामने जिकले? आकडे पाहा

IND vs AUS, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना मंगळवारी (४ मार्च) होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने येतील. आयसीसी एकदिवसीय स्पर्धांच्या बाद फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ६ वेळा आमनेसामने आले आहेत.

अशाप्रकारे आयसीसी वनडे स्पर्धेच्या बाद फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया सातव्यांदा भिडणार आहेत.

पण ICC ODI स्पर्धांच्या बाद फेरीत कोणत्या संघाचा वरचष्मा राहिला आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ICC ODI स्पर्धांच्या बाद फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड कसा आहे? हे आपण येथे जाणून घेणार आहोत.

भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ वेळा पराभव केला

ICC ODI स्पर्धांच्या बाद फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ वेळा पराभव केला आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८ च्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आले होते. ज्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ४४ धावांनी पराभव केला. चॅम्पियन्स ट्रॉफी २००० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला होता. यानंतर २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला होता.

ऑस्ट्रेलियाने भारताचा ३ वेळा पराभव केला

तसेच, ICC ODI स्पर्धांच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ३ वेळा पराभव केला आहे. एकदिवसीय विश्वचषक २००३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी पराभव केला. यानंतर एकदिवसीय विश्वचषक २०१५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. याशिवाय २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

भारत-ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड

मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केले आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघ भारताला पराभूत करू शकलेला नाही.

पण एकदिवसीय स्वरूपातील एकूण रेकॉर्ड याच्या उलट आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १५१ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ८४, तर भारताने ५७ सामने जिंकले आहेत.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या